Ramesh Tawadkar: घटनात्मक आणि तटस्थ असणाऱ्या सभापती पदावर असताना राजकीय भाष्य करू नये, हे संकेत न पाळता विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे राजकीय विधान करून सभापतिपदाची विटंबना केली, अशी टीका राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले यांनी केली आहे.
दैनिक 'गोमन्तक'मध्ये आज (25 नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिंबले यांनी नमूद केले की, सभापती या घटनात्मक पदाला लज्जा उत्पन्न करणारे आणि त्या पदाची प्रतिष्ठा, पावित्र्य नष्ट करणारे असे वक्तव्य तवडकर यांनी केले आहे. त्यांनी सभापती पदाची मर्यादा पायदळी तुडवली आहे.
राज्यातील भाजपचे सरकार भक्कम स्थितीत आहे. सरकारमध्ये अस्वस्थता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आणखी बदल होणार नाहीत, अशी विधाने करणे सभापतींना शोभा देत नाही. सभापती पदाचा अर्थ आणि त्या पदाचे गांभीर्य तवडकर यांच्या लक्षात आलेले नाही, असे ठामपणे म्हणता येते.
आमदार, मंत्री, सरकार एका बाजूला, विधानसभेचे संरक्षक म्हणून सभापती ही लोकशाहीची शान याची जाणीव त्यांना नसावी ही खंत आहे, असेही तिंबले यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.