फातोर्डा: राज्य सरकार गोमंतकीयांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यास बांधील आहे. ‘कोविड’च्या काळात राज्यात व देशात ज्या आरोग्य सुविधा तयार झाल्या, त्याचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ज्या प्रकारच्या सुविधा आहेत, त्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून 30 नोव्हेंबर 2012 पूर्वी दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा इस्पितळात हृदयरोग विभाग सुरू केला जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी केली.
कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन रविवारी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. राज्यातील हे अठरावे प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे. यावेळी आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, गोमेकॉ इस्पितळातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. गुरुप्रसाद, ‘जीडीआयडीसी’ उपाध्यक्ष, आमदार ज्योशुआ डिसोझा, कुठ्ठाळी आमदार एलिना साल्ढाणा, कासावली सरपंच फेर्विन साल्ढाणा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कर्करोगावर उपचार करण्यासाठी सर्व सुविधांयुक्त खास कर्करोग इस्पितळ सरकार ऑक्टोबर पूर्वी कार्यान्वित करेल, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.