Smart City : राजधानी पणजीत ‘स्‍मार्ट’ गटार खचले; विरोधकांचा सरकारवर निशाणा

Smart City : या कामांचा विषय येत्या विधानसभेत पुन्हा गाजणार असे दिसते. कारण गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने या कामांच्या ऑडिटची तसेच ‘आयपीएससीडीएल’ची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Smart City
Smart City Dainik Gomantak

Smart City :

पणजी, ताडमाड-सांतिनेज येथील गटाराचे काम खचल्याने विरोधकांना आता पुन्हा ‘स्मार्ट सिटी’ कामांच्‍या दर्जाबाबत आयते कोलित मिळाले आहे.

या कामांचा विषय येत्या विधानसभेत पुन्हा गाजणार असे दिसते. कारण गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने या कामांच्या ऑडिटची तसेच ‘आयपीएससीडीएल’ची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘स्मार्ट सिटी’ मिशनअंतर्गत पणजीत कामे सुरू झाल्यानंतर रस्ते खचणे, मॅनहोलच्या जागी सुरक्षेचे उपाय न योजणे, पाणी साचणे आदी प्रकार घडत आहेत. त्‍यामुळे गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर आगपाखड केली होती. यापूर्वी या कामांचे ऑडिट करण्याची व श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली होती. तसेच स्मार्ट सिटीच्‍या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सतत विरोधी पक्षांकडून होत आला आहे. शेकडो कोटी रुपये खर्चून करण्‍यात येणाऱ्या या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा विरोधकांचा आरोप आजही कायम आहे.

सांतिनेजमधील ताडमाड मंदिरासमोरच मॅनहोलचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्याच्या बाजूला असलेले गटार खचल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सरकारवर टीका केली.

Smart City
Goa Todays Update News: ‘आमदार अपत्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, अन्यथा...’ सभापती तवडकरांना अमित पाटकरांचा इशारा

दरम्‍यान, जेथे गटार खचला आहे, ती जागा पूर्ववत करण्यासाठी काम सुरू आहे. खोदलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे आणि आपत्‍त्कालीन शोरिंगचा वापर केला जात आहे, असे ‘आयपीएससीडीएल’ने कळविले आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

‘स्मार्ट सिटी’ची कामे करणाऱ्या कंत्राटदाराचाही भ्रष्टाचारात सहभाग आहे. खरे तर ‘आयपीएससी डीएल’ची चौकशी करण्याची गरज आहे. कंत्राटदाराने कर्नाटकात काम केल्याचे जे पत्र दाखविले आहे, तेही बहुधा खोटे असावे. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायला हवे. पण राज्य सरकारचे त्याच्यावर बरेच प्रेम असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री अशा कंत्राटदारांना का पाठीशी घालत आहेत?

- अमित पालेकर, राज्य संयोजक (आप)

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे हा महाघोटाळा आहे. सुमारे ११०० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्‍यांनी गुन्हा दाखल केला नाही तर गोवा फॉरवर्ड मुख्य सचिवांविरोधातच गुन्हा दाखल करेल. सांतिनेज येथे अचानक कोसळलेल्‍या सिमेंट काँक्रीट बांधकामाचे ऑडिट करण्याबरोबरच त्याची सखोल चौकशी केली पाहिजे.

- विजय सरदेसाई, अध्यक्ष (गोवा फॉरवर्ड)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com