Panaji Smart City: चिंताजनक! राजधानी पणजीत वाढले वायूप्रदूषण; स्‍मार्ट सिटीची कामे, वाढत्‍या वाहनांचा परिणाम

Smart City Panjim: वाहनांची वाढती संख्या, पणजीतील धूळप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा अभाव, काँक्रीटची जंगले आणि वृक्षतोडीमुळे राजधानी पणजीसह राज्यात वायुप्रदूषण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Panaji Smart City
Panaji Smart City PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City Pollution

पणजी: हरित आवरण, शुद्ध हवा, पाणी आणि अन्नासाठी गोवा राज्य प्रसिद्ध आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या, पणजीतील धूळप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा अभाव, काँक्रीटची जंगले आणि वृक्षतोडीमुळे राजधानी पणजीसह राज्यात वायुप्रदूषण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालानुसार, पणजीच्या पाटो परिसरात पीएम १० (७४) आणि २.५ (५४.७१) मोजमाप हे सध्याच्या परवानगीयोग्य मर्यादेत (क्रमशः ०-१०० आणि ०-६०) असले तरी वरच्या मर्यादेजवळ पोहोचले आहे. विशेषतः पाटो परिसरात वाढलेल्या व्यावसायिक हालचाली व बसस्थानकांमुळे हा आकडा चिंताजनक बनला आहे.

पणजीचा अल्तिनो भाग, जो हिरवाईसाठी आणि कमी वाहतुकीसाठी ओळखला जातो, तिथे देखील वायू गुणवत्ता निर्देशांक वरच्या मर्यादेच्या जवळ येताना दिसतोय. हे मोजमाप अद्याप नियमांमध्ये बसते, परंतु हा वाढता कल भविष्यासाठी चिंतेचा विषय आहे. राजधानी पणजीत गेल्‍या तीन दिवसांपासून प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. शिवाय सध्‍या धुके पडत असल्‍याने प्रदूषित वायू वातावरणाच्‍या वरील थराला न जाता भूपृष्‍ठ पातळीपासून जवळच राहतो; परिणामी उपद्रव मूल्‍यात अधिक वाढ होऊन मानवी आरोग्‍यास धोका निर्माण संभवतो.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्‍यात विविध ठिकाणी हवा प्रदूषण चाचणी करणारी यंत्रणा कार्यान्‍वित केली आहे. त्‍याद्वारे नियमित आढावा घेण्‍यात येतो. गोव्‍यात प्रदूषणाचे प्रमाण सरासरी कमी राहते; परंतु हल्‍लीच्‍या काळात अधूनमधून हा आलेख उंचावत आहे. गत तीन दिवसांत राजधानी पणजीतील सांतिनेज परिसरात प्रदूषण पातळी वाढल्‍याचे आढळून आले आहे. पणजीत ‘स्‍मार्ट सिटी’चे काम सुरू आहे.

त्‍यासाठी खूप खोदाई होत असून, भरीस वाहनांतून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडमुळे प्रदूषण वाढत आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. धुक्‍यामुळे प्रदूषणाचा थर खालीच राहत असल्‍याने तो अधिक घातक ठरत आहे.

Panaji Smart City
Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंचा गंडा

गोव्याने आपले ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरित आवरण जपले आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. परंतु, पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे आणि वाहनांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपले हिरवे फुप्फुस (झाडे) आणि जलस्रोत यांचे संरक्षण करणे आज गरजेचे झाले आहे, अन्यथा आपणही दिल्लीसारख्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक ४९३ वर पोहोचला असून तो गंभीर श्रेणीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com