'Shramdham rally' Canacona
'Shramdham rally' Canacona Dainik Gomantak

Canacona News : हजारोंच्या उपस्थितीत काणकोणात ‘श्रमधाम रॅली’

Canacona News : बलराम चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन ः श्रीपाद नाईक, चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग

Canacona News :

काणकोण, बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज काणकोणात भव्य ‘श्रमधाम रॅली’ काढण्यात आली. या श्रमधाम रॅलीत हजारो महिला - पुरुषांचा सहभाग होता. रॅलीतील वाहनावर सभापती रमेश तवडकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, नगराध्यक्ष सारा नाईक देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक महिला कार्यकर्त्यांनी ‘साडी’ व पुरुष कार्यकर्त्यांनी ‘श्रमधाम योजने’चा लोगो असलेले ‘टी-शर्ट’ परिधान केला होता. या रॅलीचा समारोप चावडी येथे झाला.

यासंबंधी सभापती रमेश तवडकर यांचे एक प्रमुख कार्यकर्ते विशांत गावकर यांना विचारले असता, ही रॅली श्रमधाम योजनेच्या जागृतीसाठी आहे. काणकोणात सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना काणकोण बाहेर केपे, धारबांदोडा, प्रियोळ यांसह अन्य भागांत तिथल्या कार्यकर्त्यांनी पोचवली आहे.

'Shramdham rally' Canacona
Goa Drowning Case: राजबाग येथे संगीतकार तर वास्कोत दीड वर्षीय चिमुकलीचा समुद्रात बुडून मृत्यू

एक हजार कार्यकर्त्यांची होणार नोंदणी

या रॅलीच्या निमित्ताने एक हजार कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांनी वर्षातून पाच दिवस श्रमदान करणे अपेक्षित आहे. श्रमधाम योजनेचे वारू आता कार्यकर्त्यांचे बळ मिळाल्यामुळे थांबणार नाही. या योजनेची व्याप्ती कर्नाटकसारख्या ग्रामीण भागातही पोचली आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com