Shapur Bus Stand Passengers : शापूरमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात; रस्त्यावरच बसची प्रतीक्षा

Shapur Bus Stand Passengers : त्यातच प्रवासी बसेस मुख्य बसस्थानकावर न येता वाहतूक खात्याच्या इमारतीजवळ थांबवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच ताटकळत थांबतात.
Shapur  Bus Stand Passengers
Shapur Bus Stand PassengersDaink Gomantak

Shapur Bus Stand Passengers :

मडकई, शापूर-फोंडा येथील कदंब बसस्थानकावर अनागोंदी सुरू असून त्याचा फटका प्रवासी वर्गाला बसत आहे. या बसस्थानकाला लागून असलेल्या फर्मागुढी ते म्हार्दोळपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून स्थानकावर सगळीकडे धूळ पसरते.

त्यातच प्रवासी बसेस मुख्य बसस्थानकावर न येता वाहतूक खात्याच्या इमारतीजवळ थांबवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच ताटकळत थांबतात.

विशेष करून, कर्नाटक राज्यातील बसगाड्या बसस्थानकावर कुठेही थांबवल्या जातात. त्या बसचा शोध प्रवाशांना घ्यावा लागत असल्याने प्रवासी चहा टपऱ्या तसेच पानबिडी गाड्यांच्या वळचणीला थांबतात. या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने या प्रवाशांना धोका संभवत आहे.

मागच्या वेळेला या बसस्थानकाची दुरुस्ती रखडल्यानंतर एकदाचे काम पूर्ण केले होते. आता या बसस्थानकाला बांदोडा - मडकईचा भुयारी मार्ग जोडला जाणार असून शापूर येथील रहिवाशांना हा मार्ग सोयीचा ठरणार आहे.

स्वच्छतागृह बंद असल्याने गैरसोय

या बसस्थानकावर असलेले सुलभ शौचालय बंद करण्यात आले आहे. नवीन स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. मात्र, नवीन शौचालयाचे बांधकाम पूर्ण न होताच आधीचे शौचालय बंद करण्यात आल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी उघड्यावरच मूत्र विसर्जन करतात. साहजिकच सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे.

Shapur  Bus Stand Passengers
Goa Daily Update: अवकाळीची हजेरी, पणजीत दाणादाण, तेरेखोल येथे खून; गोव्यातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

खासगी बसेसही स्थानकावर

वास्तविक आंतरराज्य प्रवासी बसगाड्यांना अशा स्थानकावर प्राधान्य असते. मात्र, या कदंब स्थानकावर खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या बसगाड्या बिनधास्तपणे जागा अडवून ठेवतात. त्यामुळे प्रवासी बसगाड्यांना इतरत्र जागा शोधावी लागते. त्यातच एखादा नवखा प्रवासी बसस्थानकावर आल्यानंतर त्याचा गोंधळात उडतो. त्यामुळे या बसस्थानकावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com