Porvorim: रस्ता आहे की 'ऑफरोडिंग' ट्रॅक? गिरी, पर्वरी मार्गावर पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; नागरिकांमध्ये असंतोष

Porvorim Giri Traffic Jam: गिरी आणि पर्वरी मॉल दी गोवा मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे दिवसा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
Traffic Jam In Goa
Goa TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Giri Traffic Jam

पणजी: गिरी आणि पर्वरी मॉल दी गोवा मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे दिवसा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहनचालकांना या मार्गावर गाडी चालविल्यावर ‘ऑफरोडिंग’चा अनुभव मिळत आहे.

गिरी आणि पर्वरी मार्गावर प्रवास करताना वाहतूक कोंडी ही समस्या बनली आहे. यात भर म्हणजे रस्ता वाहतुकीस चांगला नसल्याने वाहनचालकांसाठी त्रासदायक होत आहे. यामुळे वाहने खराब होण्याची शक्यता वाढली आहे. या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, हे काम सुरू होण्यापूर्वी सर्व्हिस रोड का बांधला गेला नाही, हा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.

Traffic Jam In Goa
Cash For Job: लाखोंच्या देणग्या, महाप्रसाद, दागिने अर्पण; लोकांकडून उकळलेल्या रुपयांतून 'दीपश्री'चे कारनामे

संवाद साधून कामे करा!

कोणतेही विकासकाम करताना सर्व अंगांचा विचार करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्यांवर लक्ष देऊनच विकासकाम करावे. यासाठी सरकारने नागरिकांशी संवाद साधून त्यांचे मत घ्यावे. तसेच, विकासकामांचे नियोजन करताना पर्यावरणीय परिणाम आणि वाहतुकीच्या समस्या यांचा विचार करणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया नागरिक देऊ लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com