'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी कला महोत्सवात होणारी सादरीकरणे  आशयाने जेवढी समृद्ध असतात तेवढ्याच समृद्ध या महोत्सवात आयोजित झालेल्या कार्यशाळादेखील असतात.
Serendipity Arts Festival 2024 & Workshops
Serendipity Arts Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Serendipity Arts Festival 2024 & Workshops

सेरेंडिपिटी कला महोत्सवात होणारी सादरीकरणे आशयाने जेवढी समृद्ध असतात तेवढ्याच समृद्ध या महोत्सवात आयोजित झालेल्या कार्यशाळादेखील असतात. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या यंदाच्या सेरेंडिपिटी कला महोत्सवातही कृतीप्रवणतेला आणि विचारांना चालना देणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. 

चुना/माती प्लास्टरिंग तंत्र कार्यशाळा 

मातीचे प्लास्टरिंग हा सिमेंट प्लास्टरला असणारा उत्तम पर्यावरणीय पर्याय आहे.‌ या कार्यशाळेत सहभागी होणारे प्रशिक्षणार्थी मातीचे प्लास्टर तयार करणे आणि ते भिंतीवर लावणे या दोन्ही गोष्टी शिकतील. नैसर्गिक साहित्याचा वापर करून होणाऱ्या टिकाऊ बांधकाम पद्धतीची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आहे.

संचालक: भावना जैमिनी, हिमानी चौधरी 

स्थळ:  आर्ट पार्क

१९-२० डिसेंबर, सकाळी १० ते १२.४५

दूधसागर-खांडेपार नदी; काठावरची परिसंस्था आणि सायनो‌टाईप प्रिंटिंग

गोव्यातील ही लोकप्रिय नदी आणि तिच्या काठावरील समुदायाबद्दल या कार्यशाळेत जाणून घेता येईल. कार्यशाळेत निसर्गतज्ज्ञांचे ज्ञान आणि अनुभवांची देवाण-घेवाण होईल तसेच साईनोटाईप प्रिंट्स कसे बनवावेत हे देखील शिकता येईल.

संचालक: अक्षत्रा फर्नांडिस, सानिका धाकेफळकर 

१८ डिसेंबर, सकाळी ११ ते १२.४५

स्टोरी स्टिकरिंग 

या कार्यशाळेत सहभागी झालेले त्यांच्या आवडत्या शहराशी त्यांचे नाते शोधतील आणि त्यावर आधारित कथा लिहितील. सेलो टेप आणि बटर पेपर वापरून कथा लिहिलेल्या ए५ आकाराचा कागदाचा DIY (डू इट युअर सेल्फ)  स्टिकर कसा बनवावा हे या कार्यशाळेत शिकवले जाईल. महोत्सवात ठिकठिकाणी जाऊन प्रशिक्षणार्थींना हे स्टिकर चिटकवतील, ज्यातून इतरांनाही संबंधित कथांची माहिती होईल.

संचालक: सानिका धाकेफळकर

स्थळ: आर्ट पार्क 

१८, २१ डिसेंबर, संध्याकाळी ३ ते ४.४४, सकाळी ११ ते ११:४५

गोव्याच्या अळंबी: जाणून घेणे आणि त्यांचे पीक घेणे 

या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना पश्चिम घाटाशी संबंधित असलेल्या मायसेलिया आणि बुरशीजन्य जैवविविधतेबद्दल माहिती दिली जाईल. खाद्यासाठी उपयोगी असणाऱ्या अळंबीचे पीक कसे घेता येईल हे देखील या कार्यशाळेत शिकवले जाईल. बुकवर्मने क्युरेट केलेल्या 'द लायब्ररी इज अ ग्रोविंग ऑर्गानिझम' या प्रकल्पाचा ही कार्यशाळा एक भाग आहे. 

(सूचना: ही कार्यशाळा १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे. दहा वर्षांच्या मुलांसोबत पालक असणे आवश्यक आहे.)

स्थळ: आर्ट पार्क 

१९ डिसेंबर, संध्याकाळी ३ ते ५.४५

Serendipity Arts Festival 2024 & Workshops
Dhendlo Utsav: ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’! लोकगीतांच्या गजरात गोव्यात 'धेंडलो उत्सव' साजरा

शब्दांची वीण 

एक कार्यशाळा बाल्कन प्रदेशात वसंत ऋतूत साजरा होणाऱ्या मार्टिया या परंपरेपासून प्रेरित आहे. तिथले लोक दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी विणलेल्या बांगड्या हातात घालतात आणि नंतर त्या बांगड्या हंगामातील पहिल्या फुलांच्या फांदीला बांधल्या जातात. 

या कार्यशाळेत सहभागी‌ प्रशिक्षणार्थी शब्द लिहिलेले साधे ब्रेसलेट प्रथम विणतील आणि ते नंतर शहरातील कोणत्याही झाडाच्या फांदीला बांधतील. मानव आणि निसर्ग यांच्या संबंधातल्या कथा आणि परंपरा जाणून घेणे, त्यांच्याशी स्वतःला जोडणे, त्यात भाग घेणे तसेच शहरातील नवीन जागांशी संबंध तयार करणे हा या कार्यशाळेमध्ये उद्देश आहे. 

संचालक : ललिता दा कुन्हा

स्थळ: द आर्ट पार्क,

२० डिसेंबर सकाळी ११ ते ११.४५ संध्याकाळी ४ ते ५.४५

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com