Senior Women Cricket: गोव्याच्या शिखा, श्रेयाचा शतकी झंझावात; मेघालयावर ३०० धावांनी विजय

गोव्याचा त्रिशतकी विजय; कर्णधार शिखा पांडेची १५४ धावांची खेळी
श्रेया परब (डावीकडे) व शिखा पांडे.
श्रेया परब (डावीकडे) व शिखा पांडे.Dainik Gomantak

Senior Women Cricket: शिखा पांडे आणि श्रेया परब यांच्या शतकी झंझावातासमोर मेघालयाचा दुबळा संघ पार कोसळला. पूर्ण वर्चस्व राखताना सीनियर महिला एकदिवसीय सामन्यात गोव्याने ३०० धावांनी एकतर्फी विजय नोंदविला.

स्पर्धेच्या क गटातील सामना गुरुवारी केरळमधील त्रिवेंद्रम येथे झाला. मेघालयाने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथमच फलंदाजीचे आमंत्रण दिले, परंतु हा निर्णय त्यांच्यावर पूर्णपणे उलटला.

कर्णधार शिखा पांडे हिने नाबाद दीडशतक नोंदविताना ८५ चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १५४ धावांची खेळी केली. सलामीच्या श्रेया परबने १३९ धावा केल्या. तिने १३८ चेंडूंत १७ चौकार व १ षटकार मारला. गोव्याने निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३६४ धावा केल्या.

त्यानंतर मेघालयाचा डाव २६.३ षटकांत अवघ्या ६४ धावांत गुंडाळून गोव्याने त्रिशतकी विजय साकारला.

श्रेया परब (डावीकडे) व शिखा पांडे.
Goa Crime News: धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला चक्क परतला घरी; मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो कुणाचा?

१८७ धावांची भागीदारी

गोव्याच्या डावात पूर्वजा वेर्लेकर (१२) लवकर बाद झाली. श्रेयाने कमजोर गोलंदाजीवर हल्ला चढविताना दुसऱ्या विकेटसाठी विनवी गुरव (४०) हिच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. विनवी बाद झाल्यानंतर श्रेया व शिखा यांनी मेघालयावर चौफेर हल्ला चढविला.

या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १२६ चेंडूंतच १८७ धावांची भागीदारी केली. यामध्ये शिखाच्या १२१, तर श्रेयाच्या ६३ धावा होत्या. या दोघींच्या आक्रमकतेमुळे गोव्याने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविली.

श्रेया परब (डावीकडे) व शिखा पांडे.
Goa Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार प्रकरणी पर्वरीतील एकास अटक

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ३ बाद ३६४ (पूर्वजा वेर्लेकर १२, श्रेया परब १३९, विनवी गुरव ४०, शिखा पांडे नाबाद १५४, तरन्नुम पठाण नाबाद ६) वि. वि. मेघालय ः २६.३ षटकांत सर्वबाद ६४ (डी. दत्ता २५, निकिता मळीक ४-०-१२-०, शिखा पांडे २-१-४-३, तरन्नुम पठाण ५-१-११-२, प्रियांका कौशल ४-१-७-०, सुनंदा येत्रेकर ६-३-१०-२, दीक्षा गावडे २.३-१-३-२, पूर्वा भाईडकर ३-०-१३-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com