Canara Bank : कॅनरा बँकेकडून विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती; स्‍तुत्‍य उपक्रमाबद्दल सर्व थरांतून बँकेचे अभिनंदन

Canara Bank : ‘विद्या ज्योती’ योजना; या योजनेंतर्गत शांतादुर्गाच्या सहा विद्यार्थिनींना या शिष्यवृत्त्‍या मिळालेल्या आहेत. शांतादुर्गा विद्यालयात आयोजित सोहळ्यात या शिष्यवृत्ती वितरित करण्यात आल्या.
Canara Bank
Canara BankDainik Gomantak
Published on
Updated on

Canara Bank :

डिचोली, येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना कॅनरा बँकेकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत.

बँकेच्या ‘विद्या ज्योती’अंतर्गत उपेक्षित घटकांतील म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्त्‍या देण्याची कॅनरा बँकेची योजना आहे.

या योजनेंतर्गत शांतादुर्गाच्या सहा विद्यार्थिनींना या शिष्यवृत्त्‍या मिळालेल्या आहेत. शांतादुर्गा विद्यालयात आयोजित सोहळ्यात या शिष्यवृत्ती वितरित करण्यात आल्या.

या सोहळ्यास कॅनरा बँकेच्या डिचोली शाखेचे व्यवस्थापक सुहास माळी, अधिकारी सुषमा, श्री शांतादुर्गा परिवाराचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष सदाशिव वालावलकर, उच्च माध्यमिक विभागाचे व्यवस्थापक अरुण साळकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजीत तेली, मुख्याध्यापिका एडना रॉड्रिगीस आणि सहमुख्याध्यापिका यास्मिन शेट्ये उपस्थित होत्या.

Canara Bank
Goa Drug Case: डिलिव्‍हरी करायला आला अन् जाळ्यात अडकला, मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ 2.71 लाखांचे अमली पदार्थ जप्त

या उपक्रमाबद्दल विजय सरदेसाई यांनी कॅनरा बँकेला धन्यवाद दिले. शिक्षिका तन्वी पळ यांनी सूत्रसंचालन केले. श्रीया जल्मी हिने आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com