Sarpreet Singh Gill : कोडिंग, रोबोटिक्समुळे शिक्षणात प्रगतीची संधी !

शिक्षण सचिव सरप्रीत सिंग गिल : ‘सीएआरइएस’ वर विविध घटकांशी चर्चा
coding robotics
coding roboticsDainik Gomantak
Published on
Updated on

कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षण विद्यार्थ्यांना विचार करण्यास वाव देते आणि प्रगती साधण्याचे शिक्षण देते, असे गोव्याचे शिक्षण सचिव सरप्रीत सिंग गिल यांनी सांगितले. शाळांमध्ये 6 वी, 7 वी व 8 वी या वर्गांसाठी कोडिंग आणि रोबोटिक्स याबाबत पुढाकार घेणारे गोवा हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

तांत्रिक शिक्षण संचालनालय आणि शिक्षण संचालनालय यांनी प्रकल्प व्यवस्थापन युनिट (पीएमयू) यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी आणि गोव्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालये यांचे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स योजना (सीएआरइएस) यावर चर्चेसाठी गोवा राज्य कर भवन, आल्तिनो - पणजी येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

coding robotics
QR Code Payment Risk : क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा! अन्यथा सहन करावे लागेल मोठे नुकसान

या बैठकीस शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. विवेक कामत आणि प्रकल्प व्यवस्थापन युनिटचे प्रकल्प संचालक डॉ. विजय बोर्जेस आदी उपस्थित होते. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा व त्यांना समाधान देणारा व्यवसाय निवडावा. त्यांनी पीएमयूच्या दोन वर्षांच्या वाटचालीची प्रशंसा केली.

coding robotics
Uniform Civil Code Bill: समान नागरी कायद्यासंबंधी राज्यसभेत मांडले खासगी विधेयक, विरोधकांचा हल्लाबोल

डॉ. विवेक कामत यांनी सांगितले की, नव्या शैक्षणिक वर्षात बहुतेक शाळांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमांत कोडिंग आणि रोबोटिक्स यांचा समावेश होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि योजनांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणात प्रकल्प व्यवस्थापन युनिटने बजावलेल्या कामगिरीविषयी डॉ. विजय बोर्जेस यांनी यावेळी माहिती दिली.

‘सीएआरइएस’चा ६० हजार विद्यार्थ्यांना लाभ

कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स स्कीम (सीएआरइएस) खाली गोव्यातील 60 हजार विद्यार्थी आणि 500 हून अधिक शिक्षकांनी लाभ घेतला आहे. पीएमयूने शिक्षकांच्या क्षमता आणि कौशल्य सुधारणेयासाठी 1 लाख 49 हजार तासांचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच डिझाईन थिंकिंग गोवा 2023 चे 27 शाळा, 29 शिक्षक आणि 75 प्रकल्पांसह 890 विद्यार्थी हे भाग बनले आहेत. त्याशिवाय माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान प्रयोगशाळांची सुधारणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com