Sao Jose De Areal: ‘स्वच्छता ही सेवा!’ 'सां जुझे दी आरियाल'चा जागृती कार्यक्रम; कृषी, मच्छीमारी, पशुसंवर्धन खात्यांचा सहभाग

Sao Jose De Areal Panchayat: सां जुझे दी आरियाल ग्रामपंचायतीतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेवर आधारित आंतर खाते योजना जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत कृषी खाते, मच्छीमारी खाते आणि पशुसंवर्धन व पशुचिकित्सा सेवा खाते अशा तीन खात्यांचा सहभाग होता.

Sao Jose De ArealDainik Gomantak
Published on
Updated on

Sao Jose De Areal Grampanchayat

पणजी: सां जुझे दी आरियाल ग्रामपंचायतीतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेवर आधारित सरकारी योजनांवरील आंतर खाते योजना जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत कृषी खाते, मच्छीमारी खाते आणि पशुसंवर्धन व पशुचिकित्सा सेवा खाते अशा तीन खात्यांचा सहभाग होता.

या कार्यक्रमावेळी जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो उपस्थित होत्या. त्यांनी सां जुझे दी आरियाल ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांना भाज्यांची बियाणी मोफत दिली. तसेच आपला शेतकरी क्लब सासष्टी तालुक्यात भात कापणीसाठी भात कापणी यंत्र उपलब्ध करणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

मच्छीमारी खात्याच्या अधिकारी अक्षता नाईक आपल्या खात्याच्या योजनांविषयी माहिती दिली. पशुचिकित्सा सेवा खात्याचे गोंझागो डिकॉस्ता यांनी पशुपालन, मुख्यमंत्री सुधारित कामधेनू योजना आदींची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायतीचे सचिव अल्लाऊद्दिन मनियार यांनी केले. उपसरपंच पायटी कार्दोज यांनी आभार व्यक्त केले.

Sao Jose De Areal Panchayat: सां जुझे दी आरियाल ग्रामपंचायतीतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेवर आधारित आंतर खाते योजना जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत कृषी खाते, मच्छीमारी खाते आणि पशुसंवर्धन व पशुचिकित्सा सेवा खाते अशा तीन खात्यांचा सहभाग होता.
Sao Jose de Areal: 'गुन्हे मागे घेऊ नका, दोषींवर कठोर कारवाई करा'; शिवप्रेमींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांना मोफत खताचे वितरण

सां जुझे दी आरियालच्या सरपंच कार्मेलिना फर्नांडिस यांनी आपल्या कार्यकाळात हाती घेतलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच शेतीविषयक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्‍वासन देत शेतकऱ्यांना मोफत खताचे वितरण यावेळी केले. विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी रायन रांजेल यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com