Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Sadanand Tanavade: सभापतिपदाचा मंत्र्याकडूनच अवमान झाला आहे, असा दावा करून तर राजीनामा देईन अशी भूमिका घेणारे सभापती रमेश तवडकर यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
Sadanand Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Tanavade Meeting With Sadanand Tanavade

पणजी: सभापतिपदाचा मंत्र्याकडूनच अवमान झाला आहे, असा दावा करून तर राजीनामा देईन अशी भूमिका घेणारे सभापती रमेश तवडकर यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तवडकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता या प्रश्नी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे.

फर्मागुढी येथील ‘उटा’च्या मेळाव्यात मंत्री गोविंद गावडे यांनी टोले हाणल्याने नाराज झालेल्या तवडकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्यानंतर त्याची दिल्लीत दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यातील आदिवासींचे नेते या नात्याने तवडकर यांना ओळखतात.

त्यांच्या श्रमधाम योजनेची माहिती जाणून घेताना तब्बल अर्धा तास वेळ तवडकर यांना दिला होता. नंतरही तवडकर पंतप्रधानांना भेटले होते. त्यामुळे त्यांच्याबाबत पंतप्रधानांना समजताच त्याची दखल घेतली जाईल याची कल्पना आल्याने दिल्लीतील नेत्यांनी प्रदेश पातळीवर तवडकर यांची नाराजी दूर करा, अशी सूचना केली आहे.

तानावडे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांसमोर दोघांनाही बसवून मिटवला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातूनही माजी मंत्री प्रकाश वेळीप, मंत्री गावडे व सभापती तवडकर यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिन्यातच हा वाद पुन्हा उफाळला. त्याला उटाचा फर्मागुढी येथे झालेला मेळावा कारणीभूत ठरला आहे.

Sadanand Tanavade
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

एक मंत्री दूरध्वनी घेत नाही, आपल्या पदाचा अवमान करतो. भाजप अशांना पाठिशी घालेल तर मी राजीनामा देतो, अशी तवडकर यांची भूमिका आहे. तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा असून पुढील आठवड्यात प्रचारकार्यातून परतल्यानंतर बैठक घेणार,असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com