Goa Taxi APP Issue: 'टॅक्सी ॲप' आणून गोमंतकीयांचा व्‍यवसाय हातातून हिसकावण्‍याचा सरकारचा प्रयत्न- मनोज परब

Goa Taxi APP Issue: गोवा पर्यटन संचालक निखिल देसाईंच्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन उद्योगाचा दर्जा खालावला आहे.
Goa Taxi APP Issue | Revolutionary Goans | Pramod Sawant
Goa Taxi APP Issue | Revolutionary Goans | Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi APP Issue: भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बढती झाल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला प्रथम प्रशिक्षण देऊन नंतर त्‍याची इतर राज्यात बदली केली जाते. परंतु पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांची दोन महिन्यांपूर्वी आयएएसमध्ये बढती होऊनही ते गोव्यातच आहेत.

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी देसाई यांचे नाव असून त्यांच्या कार्यकाळात राज्यातील पर्यटन उद्योगाचा दर्जा खालावला आहे. त्यासाठी त्यांची प्रशिक्षणासाठी इतर राज्यांत रवानगी करण्यात यावी, अशी मागणी रिव्होल्‍युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Goa Taxi APP Issue | Revolutionary Goans | Pramod Sawant
Christmas In Goa 2022: नाताळ! गोव्यात येशू जन्माचा उत्साह, राज्य विविधरंगी रोषणाईने उजळले

पर्यटनासारख्या महत्त्वाच्या खात्यात निखिल देसाई एवढी वर्षे ठाण मांडून बसले आहेत. ते तेथे कसे काय राहण्यास यशस्वी ठरले याचे उत्तर सरकारच देऊ शकते. परंतु टॅक्सीवाल्यांचे बॅच रद्द करून मागच्या दाराने गोवा माईल्स ॲप आणण्यामागे देसाई यांचेच डोके होते.

आता पुन्हा एकदा गोवा बॅच रद्द करण्याचे कारस्थान रचले जात आहे. याचा थेट लाभ परप्रांतियांना होणार आहे. कारण बॅचसाठी रहिवासी दाखल्याची आवश्‍यकता आहे. याचे सूत्रधारसुद्धा देसाई हेच आहेत, असा आरोप परब यांनी केला.

मनोज परब, ‘आरजी’चे प्रमुख-

टॅक्सी हा एकमात्र असा व्यवसाय आहे, ज्याचा ताबा गोमंतकीयांकडे आहे. आता ॲप आणून हा व्‍यवसाय देखील गोमंतकीयांच्या हातातून हिसकावण्‍याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार गोमंतकीयांना विशेषत: पेडण्यातील लोकांना त्रासात टाकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com