Wardha येथील मराठी साहित्य संमेलनात 'म्हादई' संदर्भात ठराव पारित, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ठरावाचे स्वागत केले आहे.
akhil bhartiya marathi sahitya sammelan at Wardha
akhil bhartiya marathi sahitya sammelan at WardhaDainik Gomantak
Published on
Updated on

वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या म्हादई नदी संदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ मराठी साहित्यिक रमेश वंसकर यांनी हा ठराव मांडला आणि राजमोहन शेट्ये यांनी अनुमोदन दिले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ठरावाचे स्वागत केले आहे.

(Resolution regarding mahadayi passed during akhil bhartiya marathi sahitya sammelan at Wardha)

akhil bhartiya marathi sahitya sammelan at Wardha
Goa: शिक्षा रद्द! ताडीच्या मडक्याला अल्पवयीन विद्यार्थ्याचा पाय लागल्याने केली होती मारहाण

"वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याची जीवनदायिनी म्हादई संदर्भात पारित झालेल्या ठरावाचे गोवा सरकारच्या वतीने आम्ही स्वागत करतो."

"ज्येष्ठ मराठी साहित्यिक रमेश वंसकर यांनी हा ठराव मांडला आणि श्री राजमोहन शेट्ये यांनी अनुमोदन दिले. अखिल भारतीय स्थरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादई साठी सुरू असलेल्या लढ्यात आमचं बळ वाढलं आहे." असे ट्विट प्रमोद सावंत यांनी केले आहे.

akhil bhartiya marathi sahitya sammelan at Wardha
Gujrat Crime News: गोळी मारून व्यापाऱ्याला 40 लाखांना लुटले; गोव्यात लपलेल्या तिघांना अटक

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या सुधारीत DPR ला परवानगी दिल्याने कर्नाटकचा म्हादईचे पाणी वळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कळसा आणि भांडुरा नद्या या म्हादईच्या उपनद्या आहेत. याचे पाणी वळविल्याने याचा मोठा फटका गोव्याला बसणार आहे. यात गोव्याला पिण्याचे पाणी यासह वन्य जीव आणि वनस्पतींना देखील याचा फटका बसणार आहे.

यामुळे गोव्यात मोठे वादळ निर्माण झाले असून, राज्य सरकारने देखील राजकीय लढ्यासह कायदेशीर लढ्याची तयारी केली आहे. तर, राज्यातील विरोधक आक्रमक झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात म्हादईचा ठराव पारित झाल्याने म्हादईच्या लढ्याला बळ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com