Goa Politics: बाप्‍पा त्‍यांना रस्ते, वीज पुरवण्याची बुद्धी दे !

वीजपुरवठा व रस्त्याची सोय या वाड्यावर होऊ दे, हेच मागणे येथील रहिवाशांनी श्री गणेशाकडे मनोभावे मागितले
Cotigao
Cotigao Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi: खोतीगावातील (Cotigao) डोंगर माथ्यावर असलेल्या केरी वाड्यावरील गणेश भक्तांना डोक्यावर चक्क गणेशमूर्ती घेऊन पायपीट करावी लागते. वीजपुरवठा व रस्त्याची सोय या वाड्यावर होऊ दे, हेच मागणे येथील रहिवाशांनी श्री गणेशाकडे मनोभावे मागितले.

सांगे तालुक्यातील साळजिणी (Salgini) गाव हा केरीवाड्याला जवळचा गाव आहे. साळजिणीपर्यंत वाहने येतात. त्यानंतर सुमारे एक तास पायपीट करीत येथील रहिवाशांना गणेशमूर्ती घरी आणावी लागते. वीज पुरवठ्याअभावी त्यांना समईच्या मिणमिणत्या प्रकाशात गणेश पूजन करावे लागते. गेली अनेक पिढ्या हे त्यांच्या नशिबी आले आहे.

Cotigao
Goa News : फातोर्ड्यात डुक्करांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने घबराट

फक्त निवडणुकीवेळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी वाड्याला भेट देऊन आश्वासने देऊन निघून जातात. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काहीच पदरात पडत नसल्याची त्यांची कैफियत आहे. वनहक्क कायद्याने त्यांना बरेच काही देऊ केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. या वाड्यावर पंधरा घरे आहेत. त्यांचे स्थलांतर करून पुनर्वसन करण्याच्या योजना रखडली आहे.

रस्त्यालाही आडकाठी: दोन वर्षांपूर्वी येथील युवकांनी किमान दुचाकी वाहन वाड्यापर्यंत नेण्यासाठी श्रमदानाने एक मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वन खात्याने आडकाठी आणली. विजेची सोय व्हावी म्हणून भूमिगत वीजवाहिन्या घालण्याची येथील रहिवाशांनी मागणी केली होती. वीजवाहिन्यांसाठी चर खणणे, साहित्य डोंगर माथ्यावर नेण्याची तयारी येथील रहिवाशांनी दाखवली होती. मात्र, तेही झाले नाही.

Cotigao
करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांना लागली लॉटरी

वन खात्याचे नियम विकासाआड: हा वाडा अभयारण्य कक्षेत आहे. त्यामुळे वन खात्याचे जाचक नियम या वाड्याच्या विकासाआड येतात. या वाड्याकडे जाण्यासाठी पायवाटही व्यवस्थित नाही. वीज तर नाहीच आहे. वन खात्याने सौर उर्जेवर चालणारे दिवे येथील रहिवाशांना दिले; परंतु ते नादुरुस्त झाल्यास त्यांची दुरुस्ती करण्याची उपाययोजना नाही. काहीजणांना दिव्याचा वापर करावा लागतो.

शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना डोंगर पार करून चालत नडके ते येडा व त्यानंतर खोतीगावातील शासकीय शाळा गाठावी लागते. येथील शाळकरी मुलांना नातेवाईक किंवा वसतीगृहात राहून शिक्षण घ्यावे लागते. कोणी आजारी पडल्यास किंवा गरोदर महिलेला पाळणा करून केरी डोंगरावरून चालत येडा येथे आणून त्यानंतर मोटारीने इस्पितळात न्यावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com