Ram Navami 2024 : मडगावात रामनवमी भक्तिभावाने साजरी

Ram Navami 2024 : जुना बाजारातील श्री राम मंदिरातही सकाळपासून बरीच गर्दी होती. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव झाला. यंदा महाजन रामानंद परीसराम रायकर व कुटुंबियांनी या उत्सवाचे यजमानपद भूषवले.
Ram Navami Holiday In Goa
Ram Navami Holiday In GoaDainik Gomantak

Ram Navami 2024 :

सासष्टी, मडगावात आज रामनवमी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मडगाव व परिसरातील सर्व श्री राम तसेच इतर मंदिरात भक्तांनी सकाळपासून एकच गर्दी केली होती. प्रत्येक मंदिरामध्ये पूजाअर्चा, कीर्तन व रामजन्मा नंतर तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कोंब मडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दुपारी १२.३० वाजता रामजन्माचा पाळणा महिलांनी हलविला. तत्पूर्वी ह. भ. प. उदयबुवा फडके यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

जुना बाजारातील श्री राम मंदिरातही सकाळपासून बरीच गर्दी होती. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव झाला. यंदा महाजन रामानंद परीसराम रायकर व कुटुंबियांनी या उत्सवाचे यजमानपद भूषवले.

Ram Navami Holiday In Goa
Goa Loksabha Candidate Asset: खलपांकडे 6.5 कोटींची संपत्ती; पत्‍नीकडे 11 कोटी 54 लाखांची मालमत्ता

मंगळवारी वेशभूषा स्पर्धा झाली तर आज बुधवारी ‘पुतान हाडली पोटली, बापायची फुटली’ हे नाटक झाले. या मंदिराला दुपारी कॉंग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कॅ.विरियातो फर्नांडिस यांनी भेट देऊन देवदर्शन घेतले. कोंब मडगाव येथील परमपूज्य गुरुमाउली श्री कलावती देवी यांच्या परमार्थ निकेतनातही १०.३० ते १२ पर्यंत रामनवमीचा कार्यक्रम उत्साहात झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com