पंजाब सरकारच्या गोव्यातील 8 एकर जमिनीचा वाद; माजी CM चन्नी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Charanjit Singh Channi: आठ एकर जमीन स्वस्त दरात भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी दक्षता पथकाचा तपास आता पूर्ण होण्याच्या मार्गावर
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniDainik Gomantak
Published on
Updated on

Charanjit Singh Channi: पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा समुद्रकिनारी पंजाब सरकारची आठ एकर जमीन स्वस्त दरात भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी दक्षता पथकाचा तपास आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाने चार महिन्यांपूर्वी सुरू केला होता.

काय प्रकरण आहे?

गोव्यातील पंजाब सरकारच्या या 8 एकर जमिनीवर केवळ शेती किंवा बागायत करण्यासाठी परवानगी होती, परंतु ही जमीन स्वस्त दरात 5 स्टोअर हॉटेलला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कार्यकाळात ही ८ एकर जमीन एका फाइव्ह स्टार हॉटेल चेनला देण्यात आल्याचा आरोप आहे. गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर असलेली ही जमीन पंजाब सरकारच्या नवीन पर्यटन धोरणांतर्गत प्रति महिना एक लाख रुपये दराने देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीएम भगवंत सिंह मान यांनी संबंधित विभागाला जमिनीशी संबंधित नोंदी दक्षता पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते आणि या प्रकरणाच्या तपासाला गती देण्याचेही सांगितले होते.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, चन्नी यांना या जमिनीशी संबंधित सर्व बाबी आधीच माहीत होत्या. चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते.

त्या काळातही चन्नी यांच्याकडे गोव्यातील पंजाब सरकारच्या या जमिनीची संपूर्ण माहिती होती, कारण अनेक हॉटेल कंपन्यांनी यासाठी पंजाब सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही जमीन सरकारला भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com