Chilli Rates : ‘सिमला मिरची’ने गाठले शतकच; भाज्यांचे दर वधारले

Chilli Rates : हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी महागली
chilli
chilliDainik Gomantak
Published on
Updated on

Chilli Rates :

पणजी, राज्यात मागील दोन आठवड्यांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांदा आणि बटाटा वगळल्यास इतर भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सिमला मिरचीने शतक गाठले असून हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी, तसेच इतर पालेभाज्यांचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

आठवडाभरापूर्वी आले-लसणाच्या दराचा भडका उडाला होता. लसूण ४५० तर, आले १५० रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र, दोन-तीन दिवसांपासून लसूण आणि आल्याच्या दरात घट झाली आहे. लसूण २८० ते ३०० रुपये, तर आले १२० रुपये किलोने विकले जात आहे. आल्या-लसणाचे दर उतरले असले तरी ते विकत घेणे सर्वसामान्यांना अजूनही परवडत नाहीय.

chilli
Goa Taxi Driver : वाहतूक विभागाकडून होतेय अडवणूक; बाणावलीतील टॅक्‍सीचालकांचा आरोप

रसदार फळांना मागणी वाढली

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यापासून बचावासाठी नागरिक लिंबू पाणी, सरबत, फळांचा रस, उष्म्यापासून गारवा मिळावा यासाठी शीतपेये खरेदी करू लागली आहेत. परंतु लिंबू व इतर रसदार फळांची मागणी वाढताच त्यांच्या दरातही वाढ झाली असून उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचा लिंबू पाच रुपये प्रतिनग विकला जात आहे.

खुल्या बाजारातील दर

कांदा ४०

बटाटा ४०

टोमॅटो ५०

गाजर ६०

फ्लॉवर ४०

भेंडी ८०

कोबी ४०

हिरवी मिरची ८०

लसूण - २८० ते ३००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com