Tomato Price In Goa खुशखबर : टोमॅटोचा दर आला अर्ध्यावर!

80 रुपये किलो : पुढील महिन्‍यापर्यंत स्‍थिती येणार पूर्वपदावर; डिचोलीत आवक वाढली
Tomato Price In Goa
Tomato Price In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tomato Price: गेल्या चार-पाच महिन्यांपासून स्वयंपाक घरातून गायब झालेल्‍या आणि आहारातील एक प्रमुख घटक असलेल्या टोमॅटोचे दर आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

Tomato Price In Goa
Goa Assembly Session: पावसाळी अधिवेशन नक्की काय गवसले ?

कालपर्यंत १६० रुपयांपर्यंत असलेला टोमॅटोचा दर आज शनिवारी एकदम अर्ध्या पटीने म्‍हणजे ८० रुपयांवर आला. डिचोलीत प्रतिकिलो ८० रुपयांनी आज टोमॅटोची विक्री करण्‍यात येत होती. आवक वाढल्याने टोमॅटोचा दर उतरला असून, श्रावण महिन्यात तो पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. तसे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते. कालपर्यंत प्रतिकिलो १६० रुपयांपर्यंत दर गेला होता. त्यामुळे सामान्य लोकांच्‍या स्‍वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाला होता.

दर ऐकताच नको तो टोमॅटो म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली होती. स्वयंपाकघर सोडाच, हॉटेलमध्‍येही टोमॅटोचे दर्शन दुर्लभ झाले होते. मात्र आता टोमॅटो स्वस्त होण्याचे संकेत मिळाल्याने सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. कर्नाटकातून गोव्‍यात येणाऱ्या अन्य भाज्याही स्वस्त होण्याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

Tomato Price In Goa
Vijay Sardesai: गोव्‍याचे ‘गुडगाव’ करण्‍याचा डाव; ‍पर्यावरणप्रेमींचा सनसनाटी आरोप

डिचोलीच्या बाजारपेठेत कर्नाटक राज्यातून टोमॅटो येत असतो. मात्र हवामानातील बदलाचा परिणाम टोमॅटोच्‍या पिकावर झाला. त्यातच कर्नाटकातून दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यांनी टोमॅटोची निर्यात होत होती. त्यामुळे गोव्‍यात टोमॅटोची टंचाई निर्माण झाली होती. अन्य राज्यांतील निर्यात आता बंद झाल्याने गोव्यात टोमॅटोची आवक वाढणार आहे. हळूहळू टोमॅटोचे दर पूर्वपदावर येतील.

- रमेश रेड्डी, भाजीविक्रेता (डिचोली)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com