Premendra Shet
Premendra ShetDainik Gomantak

Premendra Shet :चोडण-साल्वादोर-द-मुंद पुलासाठी पुढील 3 महिन्‍यांत काढणार निविदा - प्रेमेंद्र शेट

चोडण-माडेल ग्रामसभेत दिले आश्‍‍वासन
Published on

Tiswadi : चोडण-साल्वादोर-द-मुंद या नियोजित पुलासाठी सरकारने गेल्या विधानसभा अधिवेशनात 250 कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. येत्या तीन महिन्यांत या पुलासाठी निविदा काढली जाईल, असे आश्‍‍वासन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आज चोडण ग्रामसभेत दिले.

चोडण-माडेल पंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा सरपंच पंढरी वर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि. 23 जुले रोजी घेण्यात आली. यावेळी आमदार शेट यांचीही उपस्थिती होती. या संधीचा फायदा घेऊन ग्रामस्थांनी नियोजित चोडण पुलाविषयी माहिती द्यावी अशी सू्चना केली असता शेट बोलत होते.

काही दिवसांपूर्वी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पर्वरीचे आमदार तथा मंत्री रोहन खंवटे, आमदार प्रेमेंद्र शेट, इतर खात्याचे अधिकारी व इतरांनी या पुलाच्या व जोडरस्त्याविषयी संयुक्त बैठक घेतली. पुलाच्या जोडरस्त्याबाबत आमदार खंवटे यांच्याकडून मान्यता घेण्यात आली आहे. त्‍यामुळे पर्वरी बाजूकडील मार्गाची समस्या सुटल्याचे आमदार शेट यांनी सांगितले.

आवश्‍‍यक दाखले घेऊनच काम करणार

माजी सरपंच तथा चोडण बेटावर पुलासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर यांनी, चोडणला जोडणारा मार्ग हा सलीम अली पक्षी अभयारण्‍यामुळे एक किलोमीटर अंतरात येत असल्याने त्‍यास केंद्र सरकार कशी काय मान्यता देणार? असा सवाल उपस्‍थित केला.

Premendra Shet
Tiswadi Farmer : मामलेदारांचे आश्‍वासन ; नवी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा आदेश

हे सर्व दाखले कायदेशीररित्या घेऊनच या पुलाच्‍या कामाला सुरूवात केली जाईल असे आमदार शेट यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच वेल्डा कुलासो, पंच जयंती नाईक, पूजा चोडणकर, पांडुरंग वायंगणकर, सल्विना परेरा, रवींद्र किनळकर, रमाकांत प्रियोळकर, संजय कळंगुटकर व सचिव गावकर यांची उपस्थिती होती.

चोडण-साल्वादोर-द-मुंद पुलासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाय दोन्ही बाजूंकडील शेतजमीन संपादन करण्यासाठी सरकारने साडेबारा कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. संबंधित शेतकऱ्यांशी लेखी करार करून झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत या पुलासाठी निविदा काढली जाईल.

- प्रेमेंद्र शेट, मयेचे आमदार

Premendra Shet
Tiswadi Traffic Jam : चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची कोंडी; प्रवाशांची उडाली तारांबळ

कामचुकार वीज कर्मचाऱ्यांवर करणार कारवाई

चोडण बेटावरील वीज खात्याच्‍या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावण्यात कामचुकारपणा केल्यास त्यांच्‍यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिला. चोडण बेटावर दोन तासाहून अधिक काळ विजेची समस्या असल्यास कोणीही नागरिकाने आपल्या मोबाईलवर थेट संपर्क साधावा. वीज समस्या सुधारण्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत आहे, असेही ते म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com