Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News : गतिरोधक रंगवा, महिलेचा कार्यालयात दोन तास ठाण; अभियंत्याकडून २४ तासांत कार्यवाही

Ponda News : निरंकाल भागातील प्रकार; वाहनचालकांकडून कौतुक

Ponda News :

फोंडा, निरंकाल भागात रस्त्याचे हॉटमिक्स केल्यानंतर घातलेले गतिरोधक वाहनचालकासाठी धोकादायक बनले होते.

पण झांबळीमळ-निरंकाल येथील ६५ वर्षीय ईनासिन आझावेदो या महिलेने धोका ओळखून थेट बांधकाम खात्याच्या कार्यालयात दोन तास बसून अभियंत्याकडून गतिरोधक २४ तासांत रंगकाम करण्याचे आश्वासन घेतले. त्यामुळे महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गवळवाडा येथील गणनाथ हायस्कूल आणि निरंकाल येथील गणनाथ मंदिराच्या जवळ नव्याने घालण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांसाठी धोकादायक बनले होते. गतिरोधकाचे रंगकाम केले नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्यावेळी अधिक धोका निर्माण झाला होता. रस्त्याच्या बाजूला भूमिगत वीजवाहिन्या घातल्यानंतर परिसरातील रस्त्याचे हॉटमिक्स करण्यात आले. त्यावेळी लोकांच्या मागणीनुसार गतिरोधक घालण्यात आले.

Ponda
Govt offices to go cashless | सरकारी सेवा आणि कार्यालये कॅशलेस होतील | Gomantak TV

रंगकाम न केलेल्या धोकादायक गतिरोधकांमुळे अपघात घडण्याची शक्यता असल्याने ईनासिन आझावेदो यांनी थेट फोंडा येथील बांधकाम खात्याच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात धडक दिली होती. येथील अभियंता कार्यलयाबाहेर गेल्याने ईनासिन आझावेदो यांनी दोन तास अभियांत्याची प्रतीक्षा केली. शेवटी अभियंता कार्यालयात दाखल झाल्यानंतर गतिरोधकाचे रंगकाम लवकर करण्याची मागणी महिलेने केली.

अवघ्या २४ तासांत गतिरोधक रंगकाम करण्याचे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिले तेव्हा ईनासिन आझावेदो या बांधकाम खात्याच्या कार्यालयातून बाहेर आल्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दोन्ही गतिरोधक रंगवले असल्याने वाहनचालकांना सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन अभियंत्याने पूर्ण केल्याने ईनासिन आझावेदो यांनी अभियंत्याचे आभार मानले आहेत.

Ponda
Goa Todays Live Update News: पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांकडून सरदेसाईंनी मागवल्या सूचना

राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघातात युवावर्गाचे नाहक बळी जात आहेत. अनेकवेळा गतिरोधकाचे रंगकाम केले नसल्याने अपघात होऊन बळी गेले आहेत. निरंकाल भागात रंगकाम केले नसल्याचे आढळून आल्याने आपण अभियंत्यांना भेटून रंगकाम करण्याची मागणी केली होती. अभियंत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.

- ईनासिन आझावेदो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com