फोंडा, थोर नाटककार कै. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी १९७० साली कृष्णंभट बांदकर यांनी लिहून सादर केलेल्या संगीत अहिल्योद्धार या नाटकाचा प्रयोग पाहिला. तिथेच त्यांना नाट्यलेखनाची स्फूर्ती मिळाली.
पुढे अण्णासाहेबांनी सं.शाकुंतल लिहून सादर केले आणि नाट्य परंपरेला लौकिक अर्थाने सुरुवात झाली. प्रत्यक्षात नाट्य ही संकल्पना गोव्यातील डोंगरी, तिसवाडी येथील रामभक्त संतकवी बांदकर यांचीच असल्याचे संदर्भ जाणकारांच्या लिखाणात सापडतात. त्यामुळे बांदकर हेच खऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीचे जनक होय, असे मत नाट्यकर्मी अशोक नाईक यांनी व्यक्त केले.
कपिलेश्वरी येथील सम्राट क्लबने गोमंत रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती श्रीधर कामत बांबोळकर, क्लबचे अध्यक्ष प्रशांत चिमुलकर व शर्मिला प्रभुदेसाई यांची उपस्थिती होती. राज गॅलरीयामधील बांबोळकर आर्ट गॅलरीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी श्रीधर कामत बांबोळकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामत बांबोळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिवाकर शिंक्रे, ममता बदामी, डॉ बिभीषण सातपुते, श्री. कामत, सचिन प्रभुदेसाई, अनंत काजरेकर, सौ गीता कामत बांबोळकर, अमृता शेणॉय आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रशांत चिमुलकर यांनी स्वागत केले. मच्छिंद्र च्यारी यांनी सूत्रसंचालन केले. शर्मिला प्रभुदेसाई यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.