Ponda News : लहानपणीच मुलांवर योग्य संस्कार करा : सुशांत सरदेसाई

Ponda News : बालभवन केंद्र खांडेपारतर्फे आयोजित केलेल्या गुणदर्शन कार्यक्रमात सरदेसाई बोलत होते. खांडेपार येथील एमआयबीके हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, हार्मोनियम वादन, नाटिका आदी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली.
Ponda
PondaDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, लहानपणीच मुलांवर योग्य संस्कार करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणासह क्रीडा व कला क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

गोव्यातील बाल भवन केंद्रातर्फे मुलासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. पालकांनी बाल भवन केंद्राच्या सुविधेचा लाभ आपल्या मुलांना मिळवून देण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षक सुशांत सरदेसाई यांनी केले.

बालभवन केंद्र खांडेपारतर्फे आयोजित केलेल्या गुणदर्शन कार्यक्रमात सरदेसाई बोलत होते. खांडेपार येथील एमआयबीके हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, हार्मोनियम वादन, नाटिका आदी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली.

Ponda
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

यावेळी बाल भवन केंद्राचे अधिकारी महेश गावस, पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष मनोहर शेटकर व खांडेपार बाल भवन केंद्राच्या प्रमुख नीलिमा नाईक उपस्थित होते.

महेश गावस यांनी बाल भवन केंद्रातर्फे मुलांसाठी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरात हजारो मुले सहभागी झाले. याचा लाभ मुलांना निश्चित भविष्यात होणार असल्याचे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन क्रिशा नाईक यांनी केले. परेश नाईक यांनी स्वागत केले. नीलिमा नाईक यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com