Ponda News : तवडकरांच्या ‘श्रमधाम’ची स्तुती; मंत्री-सभापतींच्या वादावर ढवळीकरांचे नाव न घेता वक्तव्य

Ponda News : फोंड्यात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला ढवळीकरांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, मी १९९५ सालापासून अनेक गरजूंना घरे बांधून दिली.
Energy Minister Sudin Dhavalikar
Energy Minister Sudin DhavalikarDainik Gomantak

Ponda News :

फोंडा, सभापती रमेश तवडकर यांचे ‘श्रमधाम’ योजनेतील योगदान उल्लेखनीय असून बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासारखे दुसरे भाग्य नाही. रमेश तवडकर यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज त्यांना झुकते मापच दिले.

प्रियोळ मतदारसंघातील या कामावरून सुरू असलेल्या सभापती आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वादावर ढवळीकरांनी केलेले हे भाष्य दिवसभर चर्चेचे ठरले.

ढवळीकरांनी तवडकरांबरोबरच वाळपईचे आमदार तथा वनमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या कार्याचेही काैतुक केले. फोंड्यात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला ढवळीकरांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, मी १९९५ सालापासून अनेक गरजूंना घरे बांधून दिली.

सुमारे तीनशेहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. आमदार नसतानाही मी अशीच कामे केली. एखाद्याला निवारा उपलब्ध करून देताना मिळणारे समाधान हे वेगळेच असते. प्रियोळ मतदारसंघात माझे भाऊ तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी रमेश तवडकर यांच्याकडे गरजूंना घरे बांधून देण्याची विनंती केली असता, त्यांनी ती मान्य केली. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे.

तवडकर यांचे हे कार्य केवळ काणकोण किंवा प्रियोळपुरते मर्यादित नाही, तर सबंध राज्यभर ही व्यापक चळवळ सुरू आहे. त्यामुळे त्यावरून राजकीय वाद निर्माण होणे दुर्दैवी असल्याचेही ढवळीकर म्हणाले.

Energy Minister Sudin Dhavalikar
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांची चुप्पी

सुदिन ढवळीकर यांनी आज सभापती रमेश तवडकर यांची केलेली स्तुती म्हणजे वादात उडी घेतल्यासारखेच आहे. तवडकर आणि गोविंद गावडे यांच्यात जो शाब्दिक वाद सुरू आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत इतर आमदार, मंत्री यांनीही शब्दही काढलेला नाही. मात्र, भावाच्या मतदारसंघातील हा विषय असल्याने ढवळीकरांनी तवडकरांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

‘आरजीवाले‘ एनजीओसारखे वागतात...!

राज्यातील एका राजकीय पक्षाचे ‘एनजीओ’सारखे वर्तन असून या पक्षातील लोकांचे राजकीय पक्ष नव्हे, तर ‘एनजीओ’सारखे वागणे आणि बोलणे असल्याचा टोला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी अप्रत्यक्षरित्या ‘आरजी’चे नाव न घेता हाणला.

एखाद्या राजकीय पक्षाला काही नियम अटी आणि बंधने असतात; पण या पक्षाच्या लोकांना कोणतेच तारतम्य नसल्याची टीका ढवळीकर यांनी केली. या पक्षाचे स्थान नेमके कुठे आहे ते लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचेही ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com