डिचोली: फाळणीच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या अतूट मैत्रीवर आधारीत रणजित देसाई लिखित ‘हे बंध रेशमाचे’ नाटकाचा प्रयोग केळ-पीर्ण येथे रंगला.
श्री पांडुरंग देवाच्या वार्षिक सप्ताहानिमित्त या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. अष्टगंध गोवा निर्मित या नाटकाची प्रस्तुती पांडुरंग प्रासादिक नाट्यमंडळातर्फे करण्यात आली होती. या नाटकात संगीत रंगभूमीवरील महाराष्ट्रातील प्रख्यात चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
उत्कृष्ट संवादफेक आणि त्याच्या तोडीला नाट्यगीतांचे सहजसुंदर आणि सुमधूर सादरीकरणामुळे नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले. गोमंतकातील एक नाट्यकर्मी दिगंबर परब यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्यासह दत्तगुरु केळकर, रत्नकांत गावस, विश्वजीत परब, संघर्ष वळवईकर, शारदा शेटकर आणि प्रसिद्धी सावंत या नाटकातील अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. त्यामुळे नाट्यरसिक शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून राहिले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मूळ संगीत लाभलेल्या या नाटकाला दत्तराज सुर्लकर (ऑर्गन) तर रोहिदास परब (तबला) संगीतसाथ, तर सागर गावस यांचे (पार्श्वसंगीत) लाभले होते. दिपज्योती रंगमंच रंगमंच आणि नेपथ्याची बाजू सांभाळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.