Bombay High Court Goa Bench About Porvorim Flyover Trees Cutting
पणजी: पर्वरीतील राष्ट्रीय महार्गावरील उड्डाण पूल बांधकामाच्या मार्गातील जितकी झाडे कापण्यात येतील, त्याच्या तिपटीने झाडे लावण्यात येतील. सध्या १४ झाडांपैकी ९ झाडे तोडली जाणार नाहीत. नव्याने लावण्यात येणारी झाडे कोठे व केव्हा व कोणत्या प्रकारची लावण्यात येतील याचा सविस्तर अहवाल देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने चार आठवड्याची मुदत दिली आहे.
शिवोली येथील झाडे कत्तलप्रकरणीच्या जनहित याचिकेत ॲरॉन फर्नांडिस यांनी पर्वरीतील नियोजित उड्डाण पुलासाठी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही झाडे कापली जाणार आहेत, यासंदर्भातचा अर्ज सादर केला होता.
या अर्जावरील मागील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला या उड्डाण पुलाच्या कामावेळी किती झाडे तोडण्यात येणार आहेत, त्यातील किती झाडे वाचविण्यात शक्य आहे व किती स्थलांतर करणे शक्य आहे, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सरकारने अहवाल सादर केला.
वन खात्याने तिपटीने झाडे लावण्यात अशी माहिती दिली आहे, त्याचा सविस्तर अहवाल द्यावा. ही झाडे कोठे व किती वेळेत लावण्यात येणार आहेत. ती कोणत्या प्रकारची असतील. या झाडांची जबाबदारी कोणावर असेल, याबाबतचा ठोस कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. ही माहिती देण्यासाठी चार आठवड्याची मुदत द्यावी अशी विनंती ॲडव्होकेट जनरलांनी खंडपीठासमोर केली.
पर्वरीतील उड्डाण पुलाच्या कामावेळी सध्या १४ झाडे स्थलांतर करण्याची मागणी अर्जदाराने केली होती. त्यामुळे गोवा खंडपीठाने या झाडांसंदर्भात अभ्यास केला. त्यानुसार या १४ पैकी ९ झाडे कापण्यात येणार नाहीत. उर्वरित ५ झाडांपैकी यापूर्वीच दोन झाडे कापण्यात आली आहेत. ३ झाडांपैकी एक झाड स्थलांतर करणे शक्य नाही तर उर्वरित दोन स्थलांतर करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली. अर्जदारातर्फे ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनीही वन खात्याने सादर केलेला हा अहवाल मान्य केला. मात्र नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांसंदर्भातचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश वन खात्याला द्यावेत अशी विनंती खंडपीठाला केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.