Pernem News: आराखडा रद्द करत नाहीत, तोवर आमचे आंदोलन सुरूच! जीत आरोलकर

Pernem News: ॲड. अमित सावंत म्हणाले, नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या धोरणामुळे पेडणे तालुका धोक्यात आहे.
Jit Arolkar
Jit ArolkarDainik Gomantak

Pernem News: पेडणे तालुक्यासाठी जाहीर करण्यात आलेला प्रादेशिक आराखडा स्थगित करण्यात आल्याच्या घोषणांवर आम्ही समाधानी नसून, हा आराखडा रद्द करा, तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिला.

सोमवारी (ता.९) सायंकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत, पंच प्रशांत नाईक, तुये सरपंच सुलक्षणा नाईक, आगरवाडा-चोपडे सरपंच सचिन राऊत, पालयेचे पंच सागर तिळवे व मांद्रे मतदारसंघाच्या विविध गावांतील लोक उपस्थित होते.

ॲड. अमित सावंत म्हणाले, नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या धोरणामुळे पेडणे तालुका धोक्यात आहे.

पंच प्रशांत नाईक म्हणाले, आपला पक्ष, केंद्रीय नेते व आपल्या मर्जीतील लोकांना विचारून मंत्री राणे निर्णय घेणार आहेत का? तुये सरपंच सुलक्षा नाईक म्हणाल्या, मुख्यमंत्री सावंत यांनी उपरोक्‍त प्रकरणात लक्ष घालून हा आराखडा रद्द करून आम्हाला दिलासा द्यावा.

आम्ही विकासाच्या विरोधात नाही. या गावात लोक पिढ्यान्‌पिढ्या राहत आलेले आहेत. त्यांची इथे काजू बागायती, शेतीवर उपजीविका सुरू आहे.

त्यांचे हितसंबंध राखले पाहिजेत. त्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन व या ठिकाणी कसले प्रकल्प आणणार हे सरकारने आधीच स्पष्ट करावे.

- जीत आरोलकर, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com