Pernem News : पेडणेत मान्सूनपूर्व कामांची तयारी शून्य; रस्त्यांना खड्डे

Pernem News : पेडणे पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी खोदलेले मुख्य रस्ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत किंवा त्यावर फेरडांबरीकरण करण्यात आलेले नाही.
Pernem Road
Pernem Road Dainik Gomantak

Pernem News :

पेडणे, नगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामांची अद्याप कुठलीही तयारी झाली नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे एकूण दहा प्रभाग आहेत. दहा प्रभाग असले तरी ते लहान प्रभाग आहेत.

पेडणे पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी खोदलेले मुख्य रस्ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत किंवा त्यावर फेरडांबरीकरण करण्यात आलेले नाही. पावसाळ्यापर्यंत अशाच अवस्थेत हे रस्ते राहिल्यास ते खचून अपघात होण्याची तसेच काही ठिकाणी पाणी साचून रोगराई होण्याची शक्यता आहे. ही

सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील काय, असा प्रश्‍न पेडणे नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पडला आहे.

पावसाळा तोंडावर आला तरी पेडणे पालिका क्षेत्रात अद्याप कुठेही पावसाळापूर्व कामांना सुरवात झालेली नाही.

Pernem Road
NSG Goa Blast Investigation: गोव्यातील स्फोटाचा एनएसजी तपास करणार, अधिकारी घटनास्थळी

अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, त्यात पावसाचे पाणी साचून मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता आहे. तसेच खोदकाम केलेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे आवश्यक आहे, असे मत पराष्टे-पेडणे येथील प्रसाद ताटकर यांनी मांडले.

दरवर्षी पालिकेतर्फे एप्रिल महिन्यात निविदा काढून कामांना सुरवात होते; पण यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निविदा काढण्याचे राहून गेले. दहाही प्रभागांतील गटार उपसण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो. असे असले तरी यावर उपाययोजना म्हणून रोजंदारीवर मजूर घेऊन आम्ही पावसाळ्याअगोदर गटार साफ करण्याचे काम पूर्ण करू.

- शिवराम तुकोजी, नगराध्यक्ष, पेडणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com