Goa Murder Case: पेडा-बाणावली सिदनाळ खून प्रकरण; हत्येसाठी वापरलेले फावडे सापडले

Goa Murder Case: कोलवा पोलिसांनी या प्रकरणात विश्‍वनाथची पत्नी वैभवी आणि तिचा प्रियकर सूरज मुगेरी या दोघांना अटक केली होती.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

पेडा-बाणावली येथे रहाणाऱ्या विश्‍वनाथ सिदनाळ याच्‍या खून प्रकरणात संशयितांनी वापरलेले फावडे आज कोलवा पोलिसांनी जप्त केले. याच फावड्याचा वार करून हा खून करण्यात आला होता. कोलवा पोलिसांनी या प्रकरणात विश्‍वनाथची पत्नी वैभवी आणि तिचा प्रियकर सूरज मुगेरी या दोघांना अटक केली होती.

सूरज आणि विश्‍वनाथची पत्‍नी वैभवी या दोघांनी खून करण्‍यापूर्वी विश्‍वनाथला दारु पाजून बेशुद्ध केले आणि नंतर त्‍याच्‍या डोक्‍यात फावडे हाणून त्‍याचा खून केला, अशी माहिती पुढे आली आहे. हा खून शनिवारी उत्तररात्रीच्या सुमारास घडला होता.

मंगळवारी या खुनाला वाचा फुटली होती. त्‍याच दिवशी गावाबाहेर गेलेली विश्‍वनाथची पत्‍नी वैभवी ही मडगावला आली असता पोलिसांनी तिला अटक केली होती. नंतर सूरजला बेळगाव येथे अटक करण्‍यात आली. वैभवीला यापूर्वी सात दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला आहे.

Goa Murder Case
Suchana Seth Case: 'झोपले तेव्हा कुशीत होता, उठले तेव्हा मरण पावलेला', सूचनाचा जबाब; आरोपपत्र सादर

आतापर्यंत जी माहिती पुढे आली आहे त्‍यानुसार अनैतिक संबंधातून हा खून करण्‍यात आला आहे. शनिवारी रात्री हा खून करण्‍यात आल्‍यानंतर रविवारी पहाटे सूरज आणि वैभवी घरातून पळून गेले होते. त्‍यानंतर मंगळवारी वैभवी परत आली.

वैभवी विश्‍वनाथसोबत संसार करण्‍यास राजी नव्‍हती, आणि सूरजचेही आपल्‍या पत्‍नीवरील मन उडाले होते. सूरज आणि वैभवी हे दोघे शाळेत शिकत असतानापासून एकमेकांवर प्रेम करायचे. त्‍यातूनच सहा महिन्‍यांपूर्वी त्‍या दोघांनी पुन्हा लग्‍न करण्‍याचे ठरविले.

पण त्‍यासाठी त्‍यांना विश्‍वनाथचा काटा काढणे गरजेचे होते. याचसाठी त्याचा खून करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com