Morjim News : पार्से-पाटो रस्त्यावरील धोकादायक वळणे हटवू : आमदार जीत आरोलकर

Morjim News : उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर
Morjim
Morjim Dainik Gomantak

Morjim News :

मोरजी, पार्से भगवती मंदिर समोरील पाटो रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर या रस्त्याचे भविष्यात रुंदीकरण करून जी धोकादायक वळणे आहेत, ती वळणे हटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

काही रस्ते राहिलेले आहेत. त्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण पावसाळ्यानंतर केले जाईल,असेही ते म्हणाले.

पार्से पंचायत क्षेत्रातील श्री भगवती मंदिर आणि हरी हरेश्वर मंदिर परिसरात जो जुना पाटो पूल अर्थात रस्ता होता. त्या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे आणि भगदाडे पडली होती. त्या रस्त्याची दुरुस्ती आणि हॉट मिक्स डांबरीकरणाचे काम आमदार जीत आरोलकर यांच्या प्रयत्नामुळे झाले आहे.

त्यांनी या रस्त्यावर ज्या प्रकारची धोकादायक वळणे आहेत, रस्ता असुरक्षित वाटतो, त्या-त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना केलेली आहे.

Morjim
Goa Drowning Case: राजबाग येथे संगीतकार तर वास्कोत दीड वर्षीय चिमुकलीचा समुद्रात बुडून मृत्यू

भविष्यात या रस्त्याचे सुशोभीकरण करत असताना रुंदीकरण करण्यातही पुढाकार घेतला जाईल. आणि त्यासाठी सरकारचे सहकार्य मिळत असल्याने पार्से पंचायत मंडळ, शेतकरी नागरिकांनी जमीनदारांनींही मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यास हा एक चांगला रस्ता होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार आरोलकर यांनी केले.

आमदार जीत आरोलकर म्हणाले, मतदारसंघातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. परंतु मान्सूनपूर्व जी कामे आहेत. त्या कामांना गती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com