चुरस वाढली! अवघ्या आठ महिन्यात दाबोळीवर नोंदवला गेला 4 लाख प्रवाशांचा टप्पा; तर मोपाची प्रवासी संख्या...

दाबोळी विमानतळाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे
More Passengers on Dabolim Over Mopa Airport
More Passengers on Dabolim Over Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

More Passengers on Dabolim Over Mopa Airport

मोपा विमानतळ सुरू होत असताना दाबोळी ओसाड पडेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. अखेर अपेक्षेनुसार दाबोळी आणि मोपा विमानतळामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असले तरी दाबोळी विमानतळाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

More Passengers on Dabolim Over Mopa Airport
Valpoi Police Training School: नव्याने भरती झालेल्या पोलीस तुकडीला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण नाही?

2023 पहिल्या आठ महिन्यांमध्ये मोपा विमानतळावर 2.1 दशलक्ष प्रवाशांची नोंदणी करण्यात आली आहे. तर दाबोळीवर याच कालावधीत 4.1 दशलक्ष प्रवाशांनी ये-जा केली. याचा अर्थ दाबोळीवर मोपाच्या तुलनेत दुप्पट प्रवासी उतरले. ही प्रवासी संख्या राखून ठेवण्यासाठी दाबोळी विमानतळाची मालकी असलेले भारतीय विमानतळ प्राधिकरण हालचाली करू लागले आहे.

दाबोळी विमानतळावर सध्या एकावेळी 11 विमाने उभी करता येतात. गर्दीच्या वेळी ही सुविधा अपुरी पडते म्हणून आणखीन तीन विमाने उभी करण्यासाठीची सुविधा विकसित करण्यात येत आहे. यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढवता येणार आहे, असे दाबोळी विमानतळाचे संचालक एस. व्ही. टी. धनंजय राव यांचे म्हणणे आहे.

एकंदरीत पाहता, प्रवाशांची पसंती मोपापेक्षा दाबोळी विमानतळालाच असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com