पर्ये, इतरांवर प्रेम करणे, त्यांना मदत करणे, वाईट न बोलणे, दुस्वास न करणे, इतरांना वाईट वाटणार असे न वागणे अशा प्रकारचे चांगले गुण मुलांनी अंगीकारून आपले जीवन सुंदर व संस्कारमय बनवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बाल संस्कार चळवळीतील कार्यकर्ते बाबनी मापारी यांनी केले.
गाळवाडा-निरंकाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात साखळीतील संवेदन केंद्र या संस्थेतर्फे ''आनंददायी शिक्षणातून जीवन कौशल्यांची ओळख'' यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पाडली. यावेळी संवेदन केंद्राचे कातकरी प्रकल्प समन्वयक दशरथ मोरजकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रभा गांवकर, मुख्याध्यापिका संगीता नाईक, शिक्षिका पुष्पा बोरकर आदी उपस्थित होते.
बाबनी मापारी आणि दशरथ मोरजकर यांनी कार्यशाळेचे संचालन केले. यात ३० मुलांचा सहभाग होता.
या उपक्रमाबाबत पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गांवकर यांनी स्तुती केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.