Panjim Construction: पणजीकरांचे हाल संपणार तरी कधी?

पणजी महानगरपालिकेद्वारे शहर परिसरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत, खोदकामांमुळे नागरिक वैतागले आहेत.
Panjim Construction |Road
Panjim Construction |RoadDainik Gomantak

Construction in Panjim: पणजी महानगरपालिकेद्वारे शहर परिसरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत.

मात्र, एक ना धड आणि भाराभर चिंध्या, अशा प्रकारची अवस्था शहर परिसरात सुरू असलेल्या कामांची झालेली आहे. जीव मुठीत घेऊन नागरिकांना ये-जा करावे लागत असल्याचे चित्र आहे.

अग्निशमन दल ते बाल गणेश मंदिर (बालभवन परिसर) हा रस्ता 26 जानेवारी रोजी सुरू करणार असल्याचे म्हटले आहे; परंतु या रस्त्याची अनेक कामे पूर्ण व्हायची आहेत. एकीकडे पणजी शहरातील नागरिकांना खोदकामांमुळे चालायला नीट वाटदेखील मिळत नाही,

तर दुसरीकडे शहर परिसरात लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायांवरदेखील याचा परिणाम प्रामुख्याने दिसून येत आहे.

रस्त्याच्या खोदकामांमुळे पार्किंगसाठीदेखील जागा नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना तरी घरातून बाहेर पडेणेदेखील अशक्यप्राय होऊन बसले आहे.

त्यामुळे पणजीतील नागरिक महापालिकेच्या या अपरिपक्व नियोजनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त करत आहेत. हा सर्व प्रकार आणि त्रास केवळ आणि केवळ नियोजनाच्या अभावामुळे होत असल्याची चीड नागरिक व्यक्त करत आहेत.

Panjim Construction |Road
Ponda Constituency: फोंड्यात वाहतेय निवडणुकीचे वारे!

चालायला पदपथ नाहीत

सांतिनेज येथून ताडमाड येथे जाणारा रस्ता तर खोदलाच आणि तसेच तेथे पुलाचे कामदेखील सुरू आहे.

परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात खडी, मोठ-मोठे पाईप, लोखंडी सळ्या तसेच बांधकामासाठी लागणारे इतर विविध प्रकारचे साहित्य टाकल्याने तसेच काही भागात नव्याने बांधलेली गटारे उघड्या अवस्थेत असल्याने नागरिक रस्ता ओलांडण्यासाठी करसत करत आहेत.

व्यावसायिकांना फटका

शहर भागात मोठ्या प्रमाणात फटका हा व्यावसायिकांना बसला आहे; कारण ग्राहकांना दुकानावर ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नसल्याने अनेकांमध्ये व्यापारात घट झाल्याने संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

महापालिकेने शहराचा विकास निश्‍चितपणे करावा; परंतु तो नियोजनबद्ध पद्धतीने करावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सांतिनेज सांडपाणी प्रकल्पाकडून अनेक नागरिक येथून ये-जा करत असतात. या प्रकल्पाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू असल्याने नागरिकांना फिरण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शक्य तेवढ्या लवकर हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.- सुनीला चक्रशाली

नोव्हेंबरपासून हे रस्त्याचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून तीन महिने लागणार असल्याचे सांगितले जाते. या खोदकामांमुळे आमच्या व्यापारावर परिणाम झाला असून 20 टक्क्यांनी घट झाली आहे.

ग्राहकांनादेखील येता येत नाही त्यामुळे अधिक फटका बसला आहे. धुळीमुळेदेखील अनेक समस्या उद्भवत आहेत. ही कामे लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.- नुसरत मुल्ला, व्यवस्थापक, प्रिन्स ड्राय क्लिनिंग

Panjim Construction |Road
Goa Agriculture: मातीत गोडवा पेरणाऱ्या तरुणीची कथा; सेंद्रिय पद्धतीने करते गूळाची निर्मिती

संपूर्णतः खोदकाम केल्याने ये-जा करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. अचानक जर कोणी आजारी पडले तर त्याला डॉक्टरपाशी अशा रस्त्यांतून नेता येणार नाही त्यामुळे शक्य तितक्या लवकर काम पूर्ण होणे गरजेचे आहे.- डेविड अल्बुकर्क, स्थानिक, टोंक

मी वर्षभरापूर्वी दुकान घातले होते; परंतु आता मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने व्यापारात घट झाली आहे. दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार देणे परवडत नाहीये.

आता कोठे व्यापार व्हायला सुरुवात झाली होती; परंतु खोदकामामुळे व्यापारात 80 टक्क्यांनी घट झाल्याने महापालिकेने शक्य तेवढ्या लवकर ही कामे पूर्ण करावीत.- मंगल पटेल, व्यापारी, करंझाळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com