Panaji E Bus : ‘ई-बस’मुळे पणजीत ‘स्मार्ट’ प्रवास; १ जुलैपासूून धावणार

Panaji E Bus : खासगी बसेसची जागा आता कदंब घेणार
Panaji E Bus
Panaji E Bus canva

पणजी, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या योजनेखाली पणजी शहरात कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस १ जुलैपासून धावणार आहेत. त्यामुळे शहरातील खासगी प्रवासी बससेवेची जागा या कदंबच्या ई - बसेस घेणार आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थापन आराखडा सरकारने यापूर्वीच सादर केला आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारीपूर्वी केली जाईल, अशी माहिती दिली होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने त्यासाठी मुदतवाढीचा अर्ज सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यावरील सुनावणी ३ जुलैला ठेवली आहे.

दिवजा सर्कल ते मिरामार या मांडवी नदीच्या किनाऱ्यालगत जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सांता मोनिका जेटी तसेच कॅसिनोच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक रस्ता ओलांडतात. या रस्त्यावरून वाहनांच्या गतीमुळे, धोकादायक संभवू शकतो. या ठिकाणी विभाजकावर बेरिकेड्स लावावेत, पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंग उपलब्ध करण्याचा आराखड्यामध्ये समावेश होता.

या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी वाहतूक व्यवस्थापन आराखड्यानुसार आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येईल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलली जातील, याची माहिती पुढील सुनावणीवेळी देण्यात येईल, असे खंडपीठाला सांगितले.

Panaji E Bus
Goa Road Accident: गोव्यात 3 अपघातांत 3 ठार; संतप्‍त लोकांनी रोखला महामार्ग

शहरात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी काही ठरावीक ठिकाणी मोकळीक असेल तेथूनच त्यांना रस्ता ओलांडावा लागणार आहे. सध्या ज्या ठिकाणी विभाजकावर बेरिकेड्स नाहीत किंवा ही बेरिकेड्स मोडली आहेत, तेथून पर्यटक व लोक रस्ता ओलांडत असल्याची स्थिती आहे.

प्रदूषण कमी होणार

ही विभाजकाच्या ठिकाणी बेरिकेड्स नाहीत त्या ठिकाणी ते लावण्यासाठी पणजी महापालिकेला पत्र करण्यात येणार असल्याची माहिती आज पोलिस अधीक्षकांनी ॲडव्होकेट जनरल पांगम यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दिली. ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची गरज आहे तेथे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या कदंबच्या ई बसेसमुळे शहरातील धूर प्रदूषण कमी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com