Panaji News : पक्ष फोडल्यानेच लोकांनी धडा शिकवला! विजय सरदेसाई यांचा दावा

Panaji News : हा केवळ विरोधी आमदारांचा, पक्षांचा विजय नसून जनतेचा विजय आहे. ही धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी चांगली बाब आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

पणजी, दक्षिण गोव्यातील लोक हे क्रांतिकारी आहेत, हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. गोव्यात सत्ताधारी भाजपने केलेली पक्षफोडी, भ्रष्टाचार याचा वचपा काढत लोकांनी त्यांच्या उमेदवार पल्लवी धेंपेंना पराभूत केले.

हा केवळ विरोधी आमदारांचा, पक्षांचा विजय नसून जनतेचा विजय आहे. ही धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी चांगली बाब आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

ते ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमातील विशेष मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, सरदेसाई म्हणाले, दक्षिण गोव्यातील जनतेला पक्षफोडी आवडलेली नाही. त्यामुळे सावर्डेसारख्या हिंदुबहूल भागात देखील कॉंग्रेस उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते पडली.

Vijay Sardesai
Goa Accident: कदंब बस आणि मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

ज्यावेळी भाजप निवडणूक हरते, त्यावेळी ती चर्चकडे बोट दाखवतात. परंतु निवडणूक प्रक्रियेत चर्चचा सहभाग नसतो. पराभव झाल्यावर चर्चकडे बोट दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. भाजपचे उमेदवार अयोध्येत मोठ्या मताधिक्क्याने पराभूत होतात,त्यावेळी ते काय म्हणतील ? राम देखील तुमच्या सोबत नसल्याचे दिसून येते, असे सरदेसाई यांनी सांगितले.

एकत्र आल्यास फरक पडतो हे दिसले!

मी पूर्वीपासून ‘टीम गोवा’ याबाबत बोलत होतो. परंतु त्यावेळी कोणी गांभीर्याने घेतले नाही. परंतु आम्ही जर एकत्र आलो तर त्याचा फरक पडतो हे आता दिसून आले आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊन ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा पंचायत निवडणुकाही लढणे गरजेचे आहे. ‘कॉमन मिनिमम अजेंडा’ ठरवून आम्ही पुढे जाणे गरजेचे असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Vijay Sardesai
Goa Loksabha Election Result: मांद्रे, पेडणेत खलपांना अनपेक्षित धक्का; राजकीय जाणकारांचा अंदाजही ठरला चुकीचा!

गोव्यात सरकार पडू शकते !

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे सरकार चालवत आहेत, ते पाडायचे झाल्यास कधीही पडू शकते. जी पक्षात खोगीरभरती केली आहे, त्यातील कितीजण स्वयंसेवक आहेत ? मुख्यमंत्र्यांची खुर्ची कोणाला नको आहे. सरकारमधील आमदार स्थिर नाहीत. मात्र सरकार पाडून घडविणे योग्य नसल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

‘तर कामत ५० हजार फरकाने हरले असते’

पल्लवी धेंपे या चांगल्या उमेदवार होत्या. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम आहे. धेंपेंविरोधात बोलण्यासारखे काही नाही. धेंपेंच्या प्रतिमेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मते पडली. त्यांचा भाजप उमेदवार म्हणून पराभव झाला. दक्षिण गोव्यात जर धेंंपेऐवजी दिगंबर कामतांना उमेदवारी दिली असती तर सुमारे ५० हजार मताधिक्याने त्यांचा पराभव झाला असता, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com