Panaji Murder Case : मालगाडीत झोपले अन् कर्नाटकात पोचले; मराठे खून प्रकरणातील संशयितांचा सिनेस्टाईल प्रवास

Panaji Murder Case : मात्र, ज्येष्ठ महिलेकडून प्रतिकार होईल, हे त्यांना अपेक्षित नव्हते. त्यामुळे तिला जीवंत सोडल्यास ती पोलिसांना माहिती देईल, याची त्यांना भीती वाटली. त्यामुळे तिचा खून करून ते पसार झाले.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Panaji Murder Case :

पणजी, पिशी-डोंगरी येथील ज्येष्ठ महिला गायत्री रत्नाकर मराठे यांच्या खूनप्रकरणी अटक केलेले दोघेही संशयित घटनेच्या रात्री वास्को रेल्वे स्टेशनवरून जाण्यासाठी निघाले; पण ट्रेन नसल्याने ते इतर रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यात झोपले.

या मालगाडीतूनच ते कर्नाटकमध्ये पोचले. एखाद्या सिनेमातील दृश्‍याप्रमाणे त्यांनी गोव्याबाहेर पलायन केले.

दोन्ही संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे. संशयितांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असल्याने त्यांची माहिती देण्यासाठी आंध्र प्रदेशच्या पोलिसांशी संपर्क साधला आहे. खुनासाठी वापरलेला कटर जप्त करून तो त्यांनी कोठून विकत घेतला, याची माहिती मिळवण्यात येत आहे.

Crime News
MSP For Goa Mango: आंब्याला आधारभूत किंमत देण्याचा विचार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

...अन् चोरीचा बेत ठरला निष्फळ

संशयित विजय लक्ष्मण्णा गोर्ली आणि गोरेला रवींद्र हे आंध्र प्रदेशमधील असून ते दोघे मित्र आहेत. ते गोव्यात पहिल्यांदाच ट्रेनने पर्यटनासाठी आले होते. एखादी मोठी चोरी करून पलायन करण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी त्यांनी आखलेला डाव साध्यही झाला.

मात्र, ज्येष्ठ महिलेकडून प्रतिकार होईल, हे त्यांना अपेक्षित नव्हते. त्यामुळे तिला जीवंत सोडल्यास ती पोलिसांना माहिती देईल, याची त्यांना भीती वाटली. त्यामुळे तिचा खून करून ते पसार झाले.

झुकांडी देण्याचा प्रयत्नही फसला

संशयित दुसऱ्या ट्रेनने बंगळुरूला गेले. तेथून त्यांनी आंध्र प्रदेश गाठले. मात्र, गोवा पोलिस शोध घेण्यासाठी त्यांच्या गावात पोचल्याचा सुगावा लागताच ते काही काळ तामिळनाडूत पळाले. त्यानंतर काही दिवसांना पुन्हा आंध्र प्रदेशला परतले. त्यावेळी आंध्र प्रदेशमध्येच ठाण मांडून बसलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

Crime News
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

रेल्वे सुरू झाली समजलेच नाही

घरातील दागिने वा रक्कम शोधण्यास उशीर झाल्याने तसेच कोणीतरी घरात आल्यास आपले बिंग फुटेल, या भीतीने चोरी न करताच त्यांनी त्याच रात्री वास्कोतून ट्रेनने पलायन करण्याचे ठरविले. मात्र, ट्रेन नसल्याने वास्को रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीमध्ये ते झोपले. ही गाडी रात्री निघाली, हे त्यांना कळलेच नाही. ही मालगाडी कर्नाटकमध्ये एका स्थानकावर थांबली असता, त्यांना जाग आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com