Panaji News : महापालिकेशेजारचे भंगार हटविले

Panaji News : इमारत उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, महानगरपालिकेच्या सध्याच्या इमारतीच्या शेजारी नव्या इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या जागेवर टाकलेले भंगार व टाकाऊ साहित्य शनिवारी हटविलेे.

त्यामुळे नूतन इमारतीच्या उभारणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

ऑक्टोबर २०२३ मध्ये या इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर या कामास काही आठवड्यांत सुरुवात होईल, असे वाटत होते. परंतु उत्तर गोवा नगर नियोजन विकास प्राधिकरणाकडून इमारत उभारणीसाठी जो परवाना हवा होता, तो पैसे भरल्यानंतरच मिळणार होता.

त्यासाठी १ कोटीच्यावर रुपयांचे शुल्क महानगरपालिकेने एनजीपीडीएकडे भरले होते. ही प्रक्रिया गेल्या महिन्यात पार पडली होती. आता महापालिकेकडून कामाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Panaji
Goa Crime Case: पहाटे 2 ते 4 ची वेळ साधली, वाड्यावरची सहा घरे फोडली; दाबोळीतील घटनेने खळबळ

सुट्टी पाहून काम!

ज्या ठिकाणी इमारत उभारावयाची आहे, त्या ठिकाणी टाकण्यात आलेला भंगार कचरा आता हटविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या जुन्या कर कार्यालयात सुविधा उभारण्याचे काम महापालिकेला करावयाचे आहे.

शनिवारी महापालिकेला सुट्टी असल्याने सकाळपासून इमारतीमागील भंगार व टाकाऊ साहित्य हटविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com