पणजी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत एक तरुण एटीएम कार्ड हरवल्याची तक्रार घेऊन आला व तेथील बँक महिला अधिकाऱ्याचा मोबाईल फोन घेऊन तो पसार झाला.
यासंदर्भात या अधिकाऱ्याने पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. बँकेतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात या तरुणाची माहिती कैद झाल्याने या ठकसेनाचा शोध पणजी पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक तरुण बँकेत आला व बँकेच्या अधिकाऱ्याकडे एटीएम हरवल्यासंदर्भात चौकशी करू लागला. त्यावेळी तेथे बँक अधिकाऱ्याचा मोबाईल टेबलावर होता.
काही कामानिमित्त या अधिकाऱ्याचे लक्ष अन्यत्र गेल्यावर हा तरूण त्याच संधीचा फायदा घेत हा मोबाईल घेऊन तेथून पळाला. काही वेळाने बँक अधिकाऱ्याने मोबाईल शोधण्यास सुरुवात केली असता तो सापडला नाही.
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने त्याची फुटेज पाहिली तक्रार देण्यास आलेल्या त्या तरुणाने मोबाईल लंपास केल्याचा संशय अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. पोलिसानी सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्याचा पोलिस खबऱ्यांमार्फत शोध सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार नीलेश नाईक यांच्याकडे आहे. संशयिताने तक्रारदाराचा सुमारे २० हजाराचा मोबाईल फोन असून ही घटना आज सकाळी पणजीतील राष्ट्रीयीकृत बँकेत घडली. त्याने हा मोबाईल खिशात घालून तेथून पळ काढत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे चित्रफितीच्या आधारे संशयिताला गजाआड करणे शक्य होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.