Panaji News : लोहियांनी मुक्तीची ठिणगी पेटविली : सडेतोड नायक

Panaji News : सासष्टीने सदोदित महत्त्वाची भूमिका निभावली
 Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, गोव्याच्या मुक्तिलढ्याच्या अनुषंगाने गोवा क्रांती दिनाच्या अगोदर कुंकळ्ळीचा उठाव, राण्यांचे बंड अशा अनेक गोष्टी घडल्या होत्या.

परंतु संपूर्ण गोव्यातील नागरिकांना एकत्र करत त्यांच्या मनात मुक्तीसंबंधी ठिणगी पेटविण्याचे कार्य स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केले असे इतिहास अभ्यासक सुशीला मेंडीस यांनी सांगितले.

गोमन्तक टीव्हीवरील संपादक संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात राजकीय विश्‍लेषक ॲड. क्लियोफात कुतिन्हो यांनी सहभाग घेतला.

कुतिन्हो म्हणाल्या, लोहिया हे प्रथम कृती नंतर संघटन या विचारसरणीचे होते. लोहियांचे गोमंतकीय मित्र जुलियाव मिनेझीस यांना देखील पोर्तुगीज आणि चर्चचा त्रास होत होता. ते कम्युनिस्ट असल्याची तक्रार करण्यात आली होती.

 Panaji
Goa Politics: गोविंद गावडेंचे गच्छंती अटळ? सावर्डेकरांची गणेश गावकरांसाठी मंत्रीपदाची मागणी

स्वातंत्र्यसैनिकांनी गांधी टोपी तसेच खादी वस्त्र परिधान करणे हा एकप्रकारे विरोधच होता, आम्ही तुमच्यासोबत नसल्याचा संदेश होता. क्रांती दिनाच्या अनुषंगाने सर्व गोवा एक झाला, डॉ. लोहियांच्या सभेला मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. लोहियांनी पोर्तुगीजांविरोधात माघार घेतली नाही.

...तेव्हा तुरुंगात जाणे अभिमानाची बाब!

तुरुंगात जाणे ही त्यावेळी अभिमानाची बाब होती. टी. बी.कुन्हा, लक्ष्मीकांत भेंब्रे आदींना पोर्तुगालला तुरुंगवासासाठी नेण्यात आले, त्यावेळी त्यांच्यासंदर्भात तत्कालीन वृत्तपत्रात अभिमानाने बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे गोवा क्रांती दिनाचे गोव्याच्या मुक्ती लढ्यात महत्त्वाचे स्थान असल्याचे सुशीला मेंडीस यांनी सांगितले.

दक्षिणेतील विजय जनतेचा...

दक्षिणेत आज कॉंग्रेस आपला विजय झाला म्हणत असले तरी तो जनतेचा विजय आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा विजय आहे. कारण जनतेने एकत्र येत निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न केला. याला एका विशिष्ट धर्माशी जोडणे वा धर्मामुळे मते मिळाली असे म्हणणे चुकीचे असल्याचे ॲड. कुतिन्हो यांनी सांगितले.

क्रांतिकारी गाव

वेळ्ळी, कुंकळ्ळी आणि असोळणा ही गावाची नावे जरी वेगवेगळी असली तरीदेखील ते विचाराने एक आहेत. ते मुळातच क्रांतिकारी आहेत. या तिन्ही गावांतील नागरिकांमध्येच लग्ने देखील अधिक होतात, इतर ठिकाणची व्यक्ती क्वचित लग्न करून येथे येतात. त्यामुळे विचाराने कितपत एक आहेत हे दिसून येत असल्याचे मेंडीस यांनी सांगितले.

 Panaji
Goa Waterfalls And Rivers: धबधब्यांवर जाल, तर लाखाचा दंड अन्‌ अटक; गोवा वन खात्याचा आदेश

ख्रिस्तीबांधवांच्या राष्ट्रीयत्त्वावर प्रश्‍नचिन्ह नको : ॲड. क्लियोफात कुतिन्हो

जनमत कौल असो, म्हादईचा लढा असो किंवा काही दिवसांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक असो सासष्टीने गोव्याच्या संरक्षणासाठी सदोदित महत्त्वाची भूमिका निभावली आहे. असोळणा, वेळ्ळी, कुंकळ्ळी या गावातील नागरिकांचा मुक्तीलढ्यात सदोदित पुढाकार राहिला आहे.

आता देखील भारतीय सैन्यात जर सासष्टीतील कोण असतील ते ख्रिस्ती बांधव आहेत. परंतु अनेकदा ख्रिस्तीबांधवांच्या राष्ट्रीयत्त्वावर प्रश्‍न उपस्थित केला जातो. ख्रिस्तीबांधवांकडून पोर्तुगीज पासपोर्टद्वारे रोजगाराच्या अनुषंगाने युरोपात जाण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याची शोकांतिका ॲड. क्लियोफात कुतिन्हो यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com