Panaji News : सरकारचा निर्णय गोमंतकीयांसाठी हितकारक : आलेक्स रेजिनाल्ड

Panaji News : बुधवारी पणजीत आयडीसी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड यांनी सांगितले की, असे अनेक गोमंतकीय आहेत ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट होता आणि त्यांनी तो परतविला नव्हता.
Aleixo Reginaldo
Aleixo Reginaldo Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, कुठल्याही भारतीयाचा पासपोर्ट रद्द केल्याचा दाखला ‘ओसीआय’ कार्ड मिळविण्यास पुरेसा ठरणार आहे, असा निर्णय जो केंद्राकडून घेण्यात आला आहे तो अनेक गोमंतकीयांसाठी हितकारक आहे.

या निर्णयामुळे जे गोमंतकीय बाहेर कामानिमित्त आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी जातील त्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.

बुधवारी पणजीत आयडीसी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड यांनी सांगितले की, असे अनेक गोमंतकीय आहेत ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट होता आणि त्यांनी तो परतविला नव्हता. ओसीआय कार्डचा विषय हा गोमंतकीयांसाठी फार जवळच होता, याचे कारण म्हणजे गोव्यात अनेक पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीय हे दुसऱ्या देशात उदरनिर्वाहासाठी, शिक्षणासाठी राहतात. 

Aleixo Reginaldo
Goa Video: 'सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही', तुरुंगात टाकल्याबद्दल श्रेया मुख्यमंत्र्यांना म्हणाली I Love You

रेजिनाल्ड पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला की कुठल्याही भारतीयाचा पासपोर्ट रद्द केल्याचा दाखला ओसीआय’ कार्ड मिळविण्यास पुरेसा ठरणार आहे, हे अनेक गोमंतकीयांना दिलासा देणारे होते. काही विरोधकांनी हे सरकार ओसीआय कार्डचा विषय हा फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठी वापरला जात असल्याची टीकाही केली, पण आता जो केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हे सिद्ध झाले आहे की गोमंतकीयांचे हित जपणे हे सरकारच्या मनात होते जे आता कृतीत दिसून आले आहे. यावेळी, रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गृहमंत्री अमित शाह, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

प्रश्‍‍नावर पडदा

केंद्राने यापूर्वी जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशात आपण नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होत होते. परंतु, त्यामुळे संबंधिताला ‘ओसीआय’ दर्जा मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता नव्या आदेशानुसार भारतीय पासपोर्ट रद्द झाल्यास तोच दाखला ‘ओसीआय’ कार्ड मिळविण्यासाठी वैध ठरणार आहे.

यापूर्वी ‘ओसीआय’संबंधी असाच आदेश ४ एप्रिल रोजी जारी करण्‍यात आला होता. तथापि, ३० एप्रिलला तो मागे घेतला गेला आणि शुद्धिपत्रक काढण्यात आले होते. त्‍यावरून विरोधकांनी सरकारवर मोठी टीका केली होती. परंतु आता नव्‍या आदेशाद्वारे प्रश्‍‍नावर पडदा टाकण्‍यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com