Goa News: सात औषध वितरकांचे परवाने तात्पुरते निलंबित

Goa News: नियमभंग केल्याबद्दल ‘एफडीए’ची कारवाई
Food And Drug Administration| Goa News
Food And Drug Administration| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या 6 महिन्यांत एकूण 59 औषधालयांना परवाने दिले असून नियमांच्या उल्लंघनाबद्दल 7 वितरकांचे परवाने अल्प कालासाठी निलंबित केल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या खात्याने 44 किरकोळ आस्थापने व 15 घाऊक औषध आस्थापनांना परवाने दिले आहेत. तर नोंदणीकृत फार्मासिस्टच्या देखरेखीविना औषधे देणे, नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध विक्री करणे अशा नियमभंगप्रकरणी 7 औषध विक्री आस्थापनांचे परवाने 1 ते 2 दिवसांसाठी निलंबित केले.

खात्याच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत औषध विक्रेत्यांवर 325 आकस्मिक छापे टाकले. त्यापैकी 102 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या. तसेच 73 विक्रेत्यांना नियम उल्लंघनप्रकरणी कारवाई चा इशारा दिला आहे.

नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक

केंद्र सरकारने इनव्हिट्रो डायग्नॉस्टिक्स वैद्यकीय उपकरणांची विक्री, साठवणूक, प्रदर्शन किंवा वितरण यासाठी नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यासाठी केंद्राने राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे. जर एखाद्या आस्थापनाकडे विहित परवाना नसेल तर अशा आस्थापनांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या अधिसूचनेची प्रत एफडीएने www.dfda.goa.gov.in या वेबसाईटवर अपलोड केली आहे. कागदपत्रांबाबतची यादीही येथे प्रदर्शित केली आहे. सर्व वितरक/पुरवठादार यांनी खात्याकडून 15 दिवसांत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करावेत.

Food And Drug Administration| Goa News
Elvis Gomes: नाईट लाईफ इंडस्ट्रीत 30 टक्क्यांनी वाढ

तीन नमुने अप्रमाणित

औषध निरीक्षकांनी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सरकारी संस्था व औषध विक्री आस्थापनांमधील 467 औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी खात्याच्या बांबोळी येथील प्रयोगशाळेत पाठवले. यापैकी 3 नमुने प्रमाणित दर्जाचे नसल्याचे घोषित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com