Panaji News : ‘सांबा स्क्वेअर’मध्ये महापौरांचा सपत्निक ताल

Panaji News : समितीचे सदस्य आणि नगरसेवकांची उपस्थितीही या कार्यक्रमात आवर्जुन होती.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, महापौर तथा पणजी कार्निव्हल समितीचे अध्यक्ष रोहित मोन्सेरात यांनी पत्नीस्वमवेत कार्निव्हल निमित्त सुरू असलेल्या चार दिवसीय ‘सांबा स्क्वेअर’मधील संगीताच्या तालावर रविवार ताल धरला.

‘खा..प्या.. मजा करा‘ हा संदेश देणाऱ्या कार्निव्हलचा खरा आनंद या ठिकाणी लुटला जात असल्याचे चित्र दरवर्षी पहायला मिळते.

महानगरपालिकेच्यावतीने गार्सिया गार्डनच्या परिसरात सांबा स्क्वेअरचे आयोजन केले जाते. महापौर रोहित हे पत्नी, मित्र परिवारासमवेत या ठिकाणी पोहोचले. त्यांनी येथे आयोजित संगीताच्या तालावर पत्नीसमवेत तालही धरला. समितीचे सदस्य आणि नगरसेवकांची उपस्थितीही या कार्यक्रमात आवर्जुन होती.

Goa
Goa News : नरेंद्र मोदींचे हात बळकट करा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

रविवार असल्याने हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला गर्दी दिसून आली. चार दिवस आनंद लुटण्याचे ठिकाण असल्याने अनेकजण मनमुरादपणे विविध पदार्थांचा आस्वाद घेत संगीताच्या तालावर नृत्य करताना दिसत होते. त्यात युवा वर्गाची मोठी संख्या होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com