साखळीतील पहिल्या हस्तकला सामान विक्री केंद्राचे उदघाटन; पारंपरिकतेकडे वाटचाल

साखळीतील पहिल्या हस्तकला सामान विक्री केंद्राचे तारानगर साखळी येथे उदघाटन करण्यात आले.
Opening of sakhali's first handicrafts outlet
Opening of sakhali's first handicrafts outletDainik Gomantak

साखळीतील पहिल्या हस्तकला सामान विक्री केंद्राचे तारानगर साखळी येथे उदघाटन करण्यात आले. कलाकार दशरथ पेडणेकर यांनी सुरू केलेल्या "गुरूमाऊली एंटरप्राइजेस" या माती कलेतील कलाकृती विक्री केंद्राचे उदघाटन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

Opening of sakhali's first handicrafts outlet
Goa Live Updates: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पार केली पदकांची सेंच्युरी

आपल्या दैनंदिन जीवनात आपणास काय आवश्यक आहे याची निवड करताना योग्य विचार करावा. पूर्वीच्या काळात लोक मातीच्या भांड्यांचा वापर करीत होते. बदललेल्या काळानुसार आपले राहणीमानही बदलले.

पण आज लोकांना आपल्या प्राचीन व पारंपरीक गोष्टींची गरज भासू लागली आहे. त्यासाठी लोक आता पुन्हा माती कलेतून साकारलेली भांडी तसेच इतर हस्तकलेतील वस्तूंकडे वळत आहे.

ही लोकांची गरज आणि आवड ओळखून माती कलेतील सामान हे ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून देत ते राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे आपण पोहोचवाणार यावर विचार व अभ्यास व्हावा, असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या केंद्राला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या गोमंतकीय पारंपरिक उद्योग-धंद्यांना आपले सदैव सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com