New Zuari Bridge: खूशखबर! नवीन झुआरी पुलाची दुसरी लेन नाताळपूर्वी सुरु होणार; CM सावंत

वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेर्णा जंक्शन येथे नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी सरकार प्रयत्नशील
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

New Zuari Bridge: मागील वर्षी उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित झुआरी केबलस्टेड पुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

प्रलंबित असलेल्या दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले असून, नाताळपूर्वी दुसरी लेन देखील खुली होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

येत्या 22 डिसेंबर रोजी झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. तसेच, वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेर्णा जंक्शन येथे नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सावंत म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पुलाच्या दुसऱ्या लेनवर लोड टेस्टिंग करण्यात आले होते. दुसरी लेन खुली झाल्याने पुलावरील आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या जातील, यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच झुआरी पुलाचे उद्धाटन करण्यात आले होते. 2530 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात नवीन पूल आणि बांबोळी ते वेर्णा या मार्गांचा समावेश आहे आणि एकूण प्रकल्पाची लांबी 13.20 किमी आहे.

पुलाच्या मुख्य टॉवरवर फिरते उपाहारगृह आणि व्हीविंग गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com