पश्चिम घाटात सापडली गोगलगायची नवी प्रजाती

अंबोली (Amboli) ते उत्तर कर्नाटकाच्या (Karnataka) यांना फॉरेस्ट दरम्यान आठ संशोधकांकडून (Researcher) गोगलगाईंच्या (Snail) या प्रजातींवर गेली 5 वर्षे संशोधन सुरू होते.
गोगलगोई
गोगलगोईDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: समृद्ध आदिवासाचे इंडिकेटर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोगलगाईची (snail) नवी प्रजाती पश्चिम घाटात सापडली आहे. अंबोली ते उत्तर कर्नाटकाच्या (North Karnataka) यांना फॉरेस्ट दरम्यान आठ संशोधकांकडून या प्रजातींवर गेली 5 वर्षे संशोधन सुरू होते.

डॉ. वरद गिरी
डॉ. वरद गिरीDainik Gomantak

अखेर या संशोधकांच्या कार्याला यश आले आहे. युरोपातील प्रसिद्ध युरोपियन जर्नल ऑफ टॉक्सोनॉमी या प्रसिद्ध जर्नलने वरदिया अंबोलिएन्सिस या प्रजातीची नोंद झाल्याचे जाहीर केले आहे. ती पश्चिम घाटाचा दक्षिण भाग - आंबोली , गोवा आणि कर्नाटकातील याना फॉरेस्ट पर्यंत नोंद झाली आहे. जीनस् नामकरणाची ही पहिलीच वेळ असून ती त्याचा मान डॉ. वरद गिरी यांना मिळाला आहे. (New species of snail found in the Western Ghats)

डॉ. अमृत भोसले
डॉ. अमृत भोसलेDainik Gomantak

गोगलगाई या समृद्ध पर्यावरणाचे लक्षण मानले जातात. त्यांच्यावर निसर्गामध्ये होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म बदलांचा परिणाम होतो त्यामुळेच त्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाच्या आहेत. याशिवाय अनेक प्राणी पक्ष्यांच्या त्या खाद्य आहेत. त्यांचा ‘शंक’ हा कॅल्शियमचा मोठा स्रोत असतो तर शरीर प्रोटिन्सयुक्त मसल असतात तर निसर्गातला पालापाचोळा, मेलेले कीटकांचे अवशेष यावर त्या जगतात. त्यामुळे एका अर्थाने त्या निसर्गातल्या सफाईचे मोठं काम त्या करतात.

गोगलगोई
कासव संवर्धनाची सुरवात स्थानिकांकडूनच; गोवा पोचला जगाच्या नकाशावर

या संशोधकांमध्ये लीड संशोधकांचे काम डॉ. अमृत भोसले यांचे असून, डॉ. ख्रिस्तोफर वेड, डॉ. अहमद सादी, तेजस ठाकरे, डॉ. आसिफ तांबोळी, डॉ. सुहास कदम, डॉ. दीपक मुळे, डॉ. दिनारगार्दे रहीम यांचा या संशोधक पथकामध्ये समावेश आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या (हार्पोटोलॉजी) क्षेत्रात वरद गिरी यांचे काम मोठे आहे. त्यांच्या नावावर 59 नव्या प्रजाती आणि 4 वर्ग (जिनस्) शोधल्याची नोंद आहे. त्यामुळेच या वर्गाला (जीनस्) वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे. सर्वप्रथम ही गोगलगाईची प्रजाती आंबोलीला मिळाल्याने अंबोलिएन्सिस हा उपवर्ग (जनरा) नामकरण केले अशी माहिती संशोधक डॉ. अमृत भोसले यांनी दिली आहे.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गोगलगाईसारख्या प्राण्यांनाही नैसर्गिकदृष्ट्या विशेष असे महत्त्व असते. जंगलं वाचली तरच हे छोटे जीव वाचतील आणि यासाठीच निसर्गाच्या व्यापक संवर्धनाचे नितांत गरज असल्याचे संशोधक डॉ. वरद गिरी यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com