Panaji Margao Selfie Points: पणजी बसस्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानकावर 'न्यू इंडिया' सेल्फी पॉइंट

देशातील स्किल इंडिया मोहीम आणि चांद्रयान मिशनचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे.
New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway station
New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway stationPIB
Published on
Updated on

New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway station: गोव्यातील पणजी KTCL बसस्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानकावर 'न्यू इंडिया' सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. देशाच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकणे आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या सेल्फी पॉइंट्सची उभारणी करण्यात आलीय. देशातील स्किल इंडिया मोहीम आणि चांद्रयान मिशनचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे.

पणजी बसस्थानकावर स्थित सेल्फी पॉइंटवर 'स्किल इंडिया' थीमवर फोकस करण्यात आला आहे तर, मडगाव रेल्वे स्थानकावरील सेल्फी पॉइंट येथे 'चांद्रयान मिशन'ची थीम वापरण्यात आलीय. थोड्याच कालावधीत या सेल्फी पॉइंट्सना चांगली प्रसिद्धी मिळत आहे.

सेल्फी पॉइंटवर मोठ्या उत्साहाने नागरिक सेल्फी काढत आहेत. उत्तर प्रदेशातील रितिक सेठ या तरुणाने मडगाव रेल्वे स्थानकावरील सेल्फी पॉइंटचे कौतुक केले आहे.

चांद्रयान मिशन न्यू इंडियातील तरुणांच्या आकांक्षांना मूर्त रूप देते आणि नव्या भारताची प्रगती दर्शवते. असे रितिक सेठ याने म्हटले आहे.

New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway station
PM मोदींमुळे मिळाली प्रेरणा, कॅन्सरशी लढा देणाऱ्या विश्वजीत राणेंच्या मातोश्रींनी ध्वजारोहणाला लावली हजेरी
New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway station
New India selfie points at Panaji bus stand and Madgaon railway stationPIB

न्यू इंडिया सेल्फी पॉइंट्सचे आकर्षण सर्वत्र पसरले असून, असंख्य प्रवासी नव्याने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट्सजवळ येऊन सेल्फी काढत आहेत.

"आम्ही अधिकृतपणे सेल्फी घेणाऱ्यांची संख्या मोजत नसलो तरी, अनेकांना हा उपक्रम आवडला आहे. एकता आणि यशाचे क्षण मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याच्या संधीचा फायदा अनेकजण घेत आहेत." असे सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन गोव्याच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दोन्ही ठिकाणांवरील सेल्फी पॉइंट 17 ऑगस्टपर्यंत याजागी असतील, प्रवासी, पर्यटक आणि स्थानिकांना या सेल्फी पॉइंट्च्या ठिकाणी सेल्फी काढता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com