पणजी, मत्स्योत्पादन खात्याने प्रयोगिक तत्त्वावर सुरू केलेला शिंपले उत्पादन प्रकल्प यशस्वी ठरला आहे.
शिंपल्यांचे बीज असलेले सुमारे ३५ दोरखंड समुद्रात सोडले होते, त्यात १२५ किलो शिंपल्यांचे उत्पादन मिळाल्याची माहिती मत्स्योत्पादन विभागाचे अधिकारी चंद्रेश हळर्णकर यांनी दिली.
बाजारात मोठी मागणी असलेल्या काही काही विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांचे उत्पादन घेण्यासाठी गेल्या वर्षी मत्स्योत्पादन खात्याने प्रायोगिक तत्त्वावर आखाडी येथे प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प यशस्वी झाला असून पंधरा दिवसांपूर्वी या प्रकल्पातील शिंपल्यांचे पहिले पीक घेतले आहे. बाजारात सुमारे ३०० रुपये प्रति किलो दराने या शिंपले विकले गेले, असे हळर्णकर यांनी सांगितले.
३५ हजार खर्च
हळर्णकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ''केज कल्टिवेशन'''' या पद्धतीने या प्रकल्पाला सुरवात करण्यात आली. यात शिंपल्यांचे बीज असलेले ३५ दोरखंड पाण्यात सोडले गेले. आखाडी येथील स्थानिकांनी या प्रकल्पाची निगराणी केली. या प्रकल्पातून १२५ किलो शिंपल्यांचे पीक मिळाले आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी एकूण खर्च ३५ हजार आला होता, असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.