Pernem Music Festival 2023: धारगळ येथे उद्यापासून संवादी संगीत संमेलन

Pernem Music Festival 2023: दोन दिवस आयोजन : पं. रघुनंदन पणशीकर यांच्यासह दिग्गज कलावंतांच्या संगीत मैफली
Music Festival 2023
Music Festival 2023Dainik Gomantak

Pernem Music Festival 2023: धारगळ येथील धारेश्‍‍वर देवस्थानच्‍या प्रंगणात नववे संवादी संगीत संमेलन गुरुवार दि. १६ व शुक्रवार दि. १७ डिसेंबर असे दोन दिवस आयोजित केले आहे, अशी माहिती संवादी संगीत संस्थेचे अध्यक्ष दीपक देवस्थळी व उपाध्यक्ष केशव पणशीकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे सचिव हेमंत केरकर, खजिनदार अनय तुयेकर, सुदेश प्रभुदेसाई, वसंत कोळंबकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संमेलनाचे पहिले सत्र दि. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. त्‍यात सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे व गीतगंधा गाड यांच्या नाट्यगीते व भावगीतांचा कार्यक्रम होईल.

नंतर ६ वाजता उद्‌घाटन व प्रकट कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या सत्रात मा. लक्ष्मीकांत खांडेकर यांचे एकल सतारवादन तर तिसऱ्या म्‍हणजेच शेवटच्‍या सत्रात मा. ईश्वर घोरपडे यांचे शास्रीय व उपशास्रीय गायन होईल.

Music Festival 2023
Goa Crime: मोरजीत महाराष्ट्रातील पर्यटक महिलेवर बलात्कार; हॉटेल रूममधून प्रियकर बाहेर गेला अन् अज्ञात तरूण घुसला

दुसऱ्या दिवशी दि. १७ रोजीच्‍या पहिल्या सत्राची सुरूवात विश्वास मेस्त्री यांच्‍या शास्रीय व उपशास्त्रीय गायनाने होईल.

दुसऱ्या सत्रात पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे संवादिनी एकलवादन तर शेवटच्या सत्रात गोमंतक विभूषण पेडणेचे सुपुत्र पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमात साथसंगत रोहिदास परब, दयानंद कोदोळकर, संकेत खलप, गोरक्षनाथ सावंत, राया कोरगावकर, नीलेश मेस्त्री, सात्विक नाईक हे कलाकार करतील.

निवेदनाची बाजू संजय कात्रे सांभाळणार आहेत.

पं. सुधाकर करंदीकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

संगीत संमेलनाचे उद्‌घाटन गोवा संगीत महाविद्यालये निवृत्त प्राचार्य पं. सुधाकर करंदीकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, धारगळ सरपंच अर्जुन कानोळकर, पंच प्रदीप नाईक, श्री धारेश्‍‍वर माऊली देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई यांची उपस्‍थिती असेल.

संगीत क्षेत्रात योगदान दिलेले महानंद कोठावळे, सुरेश पंडित व विकास धारगळकर यांचीही उपस्‍थिती असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com