राज्यात या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नसली तरी राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. असे असले तरी येत्या पाच दिवसात राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(Moderate to heavy rain likely over Goa in next five days - IMD)
राष्ट्रीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात 07 आणि 08 सप्टेंबर रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच 09, 10 आणि 11 रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम, जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामूळे संपूर्ण वाढ झालेली खरीप पिके आता काढणीला आली असून जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्यास हाता तोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
वास्कोत पावसाची आज सायंकाळी दमदार हजेरी
वास्कोत आज पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पावसाने संध्याकाळी 5 वाजल्यापासून जोर धरला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. सुमारे दोन तास पडलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाऊस थांबेपर्यंत वाट बघत राहावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.